तांदळाच्या आकाराइतका पेसमेकर
वैज्ञानिकांना मिळाले यश : शस्त्रक्रियेशिवाय शरीरात होणार फिट
हृदयरोगाची प्रकरणं जागतिक स्तरावर आरोग्यतज्ञांसाठी गंभीर चिंतेचा विषय ठरली आहेत. दरवर्षी हृदयाशी संबंधित आजारांमुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. अलिकडच्या वर्षांमध्ये विशेषकरून कोरोना महामारीनंतर हृदयाशी संबंधित जटिलतांमुळे हृदयाघाताच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आधुनिक चिकित्सा आणि वैद्यकीय क्षेत्रात नवोन्मेषाद्वारे हृदयाशी संबंधित गंभीर जोखिमी कमी करण्यासाठी प्रभावी तंत्रज्ञान विकसित केले असू यामुळे रुग्णांवर उपचार पूर्वीच्या तुलनेत आता सोपे ठरतील.
वैद्यकीय क्षेत्रात नवोन्मेषाच्या याच क्रमात आता वैज्ञानिकांना आणखी मोठे यश हाती लागले आहे. नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या तज्ञांनी एक अतिसुक्ष्म पेसमेकर तयार केला असून याद्वारे हृदयविकाराच्या रुग्णांना विशेष लाभ मिळू शकतो. याचा आकार तांदळाच्या दाण्याइतका असून तो सहजपणे इंजेक्शनद्वारे शरीरात इंजेक्ट केला जाऊ शकतो.
सिरिंजच्या टोकाइतका पेसमेकर
नेचर जर्नलमध्ये प्रकाशित अध्ययनानुसार नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या इंजिनियर्सनी सिरिंजच्या टोकाच्या आत फिट केला जाऊ शकेल इतका छोटा पेसमेकर विकसित केला आहे. याचबरोबर कुठल्याही शस्त्रक्रियेशिवाय किंवा चिरफाड न करता सहजपणे तो शरीरात इंजेक्टही केला जाऊ शकतो. हा पेसमेकर सर्व आकाराच्या हृदयांसाठी काम करू शकतो. जन्मजात हृदय दोष असलेल्या नवजातांच्या छोट्या, नाजुक हृदयासाठी देखील याला विशेष स्वरुपात उपयुक्त मानले जात आहे.
पेसमेकरचा उपयोग
पेसमेकर एक छोटेसे उपकरण असते, जे शरीरात प्रत्यारोपित केले जाते, हे हृदयाला नियमित गति आणि लयात धडकण्यास मदत करते. याचा वापर मुख्यत्वे अशा लोकांच्या उपचारासाठी केला जातो, त्यांना एरिथमियाची समस्या असते. काही लोकांच्या हृदयाचे ठोके अत्यंत वेगाने किंवा अत्यंत कमी होतात. याला नियमित करण्यासाठी देखील पेसमेकरचा वापर केला जातो. पेसमेकर सर्वसाधारणपणे जनरल अॅनेस्थीशियाच्या माध्यमातून शरीरात फिट केला जातो. लीडलेस पेसमेकर छोटे आणि अधिक कॉम्पॅक्ट असतात, त्यांना कॅथेटरचा वापर करून थेट हृदयात बसविले जाते. तर नवा पेसमेकर सहजपणे इंजेक्शनच्या माध्यमातून प्रत्यारोपित करता येणार ओ.
स्वत:च डिजाल्ब होणारा पेसमेकर
या नव्या आणि छोट्या पेसमेकरला एक छोट्या, मुलायम आणि वायरलेस उपकरणासोबत जोडले जाते, ज्याला पेसिंगला नियंत्रित करण्यासाठी रुग्णाच्या छातीवर लावले जाते. संबंधितच्या हृदयाचे ठोके अनियमित होत असल्याचे कळताच हे उपकरण पेसमेकरला सक्रीय करेल. केवळ अस्थायी पेसिंगची आवश्यकता असलेल्या रुग्णांसाठी हा पेसमेकर डिझाइन करण्यात आला आहे. याची गरज संपताच हा पेसमेकर स्वत:हून डिजाल्ब होणार आहे. या पेसमेकरचे सर्व घटक बायोकम्पॅटिबल असून ते स्वाभाविक स्वरुपात शरीराच्या बायोफ्लुइड्समध्ये विरघळतात आणि शस्त्रक्रिया करून ते बाहेर काढण्याची आवश्यकता नसते.