पी.व्ही. सिंधूचे आव्हान समाप्त
टोकियो : विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कुमामोटो मास्टर्स जपान खुल्या सुपर 500 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाल्याने या स्पर्धेत भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे. गुरुवारी या स्पर्धेतील झालेल्या महिला एकेरीच्या सामन्यात कॅनडाच्या 23 व्या मानांकित मिचेली ली हिने पी. व्ही. सिंधूचा 75 मिनिटांच्या कालावधीत 17-21, 21-16, 21-17 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत महिला दुहेरीत भारताच्या त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद त्याच प्रमाणे पुरुष एकेरीत लक्ष्य सेन यांचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले असल्याने भारताचे स्पर्धेतील आव्हान समाप्त झाले आहे. कॅनडाच्या मिचेली ली चा उपांत्यपूर्व फेरीचा सामना कोरियाचा सिमबरोबर होईल.