पी. यू. कॉलेज नंदगडच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा
10:03 AM Jan 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
हलशी : द. म. शिक्षण मंडळ संचलित डी.एम.एस. पी. यू. कॉलेज नंदगड येथे वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा उपक्रम महत्त्वाचे असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. क्रीडा महोत्सवाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने क्रीडा ज्योतीच्या पूजनाने करण्यात आली. क्रीडा ज्योतीचे पूजन एस. व्ही. बेंचेकर यांनी, क्रीडा मैदानाचे पूजन प्राचार्या प्रा. दीपा हन्नूरकर यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी प्रा. एन. व्ही. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना खेळांचे जीवनातील महत्व, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक आरोग्य तसेच शिस्त व संघभावना याविषयी सविस्तर माहिती दिली.
Advertisement
Advertisement