For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पी.टी.उषा यांना पतीवियोग

06:33 AM Jan 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
पी टी उषा यांना पतीवियोग
Advertisement

वृत्तसंस्था / कोझीकोडे (केरळ)

Advertisement

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष तसेच राज्यसभा सदस्य आणि माजी आंतरराष्ट्रीय महिला धावपटू पी. टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे वयाच्या 67 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले.

व्ही. श्रीनिवासन यांची प्रकृती ठणठणीत होती. शुक्रवारी सकाळी श्रीनिवासन हे अचानकपणे खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण वैद्यकीय इलाज सुरू होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. पी. टी. उषा यांना उज्वल नावाचा एक मुलगाही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी. टी. उषा यांनी शोकसंदेश पाठवित संवेदना व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.