For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पी. एन. साहेबांच्या पश्चात विकास कामासाठी नेहमीच पाठपुरावा करणार- राहुल पाटील

01:02 PM Oct 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
पी  एन  साहेबांच्या पश्चात विकास कामासाठी नेहमीच पाठपुरावा करणार  राहुल पाटील
P. N. Patil Rahul Patil
Advertisement

कसबा बीड वार्ताहर

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत आमदार पी एन पाटील यांच्या पश्चात विकास कामासाठी नेहमीच पाठपुरावा करणार असे जि प माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी शिरोली दुमाला येथे बोलताना सांगितले . करवीर विधानसभा मतदारसंघांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी व आमदार पी एन पाटील यांनी केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यासाठी करवीर विधानसभा मतदारसंघांमधील आणि अडचणी जाणून घेण्यासाठी साहेबांच्या पश्चात आपण संपर्क साधला आहे असेही ते म्हणाले . गेल्या पाच वर्षांमध्ये पी एन पाटील यांच्या माध्यमातून करवीर विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत .त्यांच्या पश्चात राष्ट्रीय काँग्रेसमार्फत पी एन पाटील यांचे पुत्र माजी जि . प. अध्यक्ष राहुल पाटील उमेदवार उभे राहणार आहेत . त्यामुळे साहेबांची जनतेशी असलेली नाळ जोडणेसाठी ,व मतदार संघातील .असणारे नाते वृद्धिगत करण्यासाठी साहेबांच्या माघारी .... आपली जबाबदारी ...विकासाची चाहूल .... जनतेस हवे आहेत राहुल ...अशा संकल्पनेतून राहुल पाटील यांनी संपर्क दौरे सुरू केले आहेत .

Advertisement

शिरोली दुमाला येथे ग्रामपंचायत सरपंच सचिन विश्वासराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपर्क दौरा सुरू झाला .यावेळी सरपंच सचिन पाटील यांनी शिरोली दुमाला परिसर राहुल पाटील यांच्या बरोबर राहील असे सांगितले .बलभीम विकास सेवा संस्थेचे चेअरमन राहुल तुकाराम पाटील यांनी आपण , आपले मित्र , आपस्वकीय यांना सर्वांना सांगून राहुल पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे आहे असे आपल्या मनोगतात सांगितले .

कोगे गावांमध्ये पी एन पाटील साहेब व कोगेगाव हे एक अतूट नाते आहे .त्यामुळे राहुल पाटील यांना कोगे गावाचे नेहमीच साथ राहील असे प्राध्यापक बाजीराव पाटील यांनी सांगितले .

Advertisement

कसबा बीड परिसरामध्ये पाडळी खुर्द , कोगे , महे, कसबा बीड , सावरवाडी , गणेशवाडी , केकतवाडी , शिरोली दुमाला, आदी भागांमध्ये काँग्रेसचे प्रत्येक गावातील सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते ,ग्रामस्थ व नागरिक राहुल पाटील यांच्या पदयात्रेत मोठ्या उत्साहात सहभागी होत आहेत .या संपर्क दौऱ्यामुळे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते ,ग्रामस्थ यांच्यात मोठा उत्साह दिसून येत आहे .

Advertisement
Tags :

.