For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाळेकुंद्रीच्या पी. जे स्पोर्ट्सकडे शिवशक्ती चषक

10:19 AM Nov 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
बाळेकुंद्रीच्या पी  जे स्पोर्ट्सकडे शिवशक्ती चषक
Advertisement

वार्ताहर/सांबरा

Advertisement

बाळेकुंद्री खुर्द येथे के आर स्पोर्ट्सच्या वतीने ठेवण्यात आलेल्या ऑल इंडिया हाफपीच क्रिकेट स्पर्धेमध्ये बाळेकुंद्री खुर्दच्या पी जे स्पोर्ट्स संघाने शिवशक्ती चषक व रोख रक्कम पटकाविले तर उपविजेता ए के 18 या संघाला चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये देशभरातील अव्वल 40 संघानी भाग घेतला होता, अंतिम सामना ए के 18 संघ व पी जे स्पोर्ट्स बाळेकुंद्री खुर्द या संघामध्ये झाला. ए के 18 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पी जे स्पोर्ट्स संघाने एकूण सहा षटकारमध्ये दोन गडी बाद करत 54 धावा जमविल्या. प्रतिउत्तरादाखल खेळताना ए के 18 संघाने सहा षटकांमध्ये 39 धावा जमविल्या.

उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आकाश नागोजी (पी जे स्पोर्ट्स), उत्कृष्ट यष्टिरक्षक किरण कुंभार (पी जे स्पोर्ट्स ),उत्कृष्ट फलंदाज जुनेद दुकानदार (एम के स्पोर्ट्स) व मालिकावीर म्हणून रूषी (शिवसेना स्पोर्ट्स खादरवाडी) यांना वैयक्तिक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धा पुरस्कर्ते मनीकंठ कुलकर्णी, माजी ग्रामपंचायतअध्यक्ष प्रशांत जाधव, कल्लाप्पा रामचन्नावर, बसवराज रायवगोळ, शांत चंदगडकर,सरफराज काझी आदी मान्यवर उपस्थित होते.पी जे स्पोर्ट्स संघाचे कर्णधार आदर्श चौगुले व उपकर्णधार अक्षय निलजकर यांच्याकडे प्रमुख पाहुण्यांचे हास्ते  शिवशक्ती चषक व रोख एक लाख रुपये देऊन गौरविण्यात आले तर तर  उपविजेता ए के 18 संघाला 50 हजार रुपयेचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.