ओजी ऑस्बॉर्नचा माहितीपट प्रदर्शित
रॉक म्युझिकचे दिग्गज आणि प्रिन्स ऑफ डार्कनेस नावाने प्रसिद्ध ओजी ऑस्बॉर्न आता हयात नाहीत. 22 जुलै रोजी वयाच्या 76 वर्षी त्यांचे निधन झाले होते. स्वत:च्या दमदार आवाजाच्या जोरावर लाखो लोक त्यांचे चाहते राहिले. ओजींच्या निधनानंतर त्यांचा माहितीपट ‘ओजी : नो एस्केप फ्रॉम नाउ’ भेटीला येणार आहे. याचा ट्रेलर आता प्रदर्शित करण्यात आला आहे. या माहितीपटात ओजी ऑस्बॉर्नच्या जीवनप्रवासाला दाखविण्यात आले आहे. त्यांच्या जीवनातील अखेरच्या क्षणांची एक भावनामक झलक सादर करण्यात आली असून यात त्यांच्या आरोग्य समस्या, पार्किंसन रोगाचे निदान आणि अन्य अनेक पैलूंवर चर्चा करण्यात आली आहे. ओजीवरून त्यांच्या पती शेरोन ऑस्बॉर्न आणि मुले एमी, केली जॅक यांच्या खुलाशांना दाखविण्यात आले आहे. या माहितीपटाचा उद्देश या दिग्गज गायकाच्या अखेरच्या 6 वर्षांची झलक सादर करणे आहे. ओजी 2019 मध्ये एका दुर्घटनेनंतर स्वत:च्या चाहत्यांचा निरोप घेण्याठी एका अंतिम शोमध्ये सादरीकरण करू इच्छित होते असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. या माहितीपटाला 7 ऑक्टोबर रोजी पॅरामाउंट प्लसवर प्रदर्शित केले जाणार आहे.