ओझोन थेरपीयुक्त दूध बाजारात आणणार : डॉ. विनय कोरे यांची घोषणा
वारणा पशुधन विकसीत करणारे देशातील प्रमुख केंद्र ठरावे
वारणानगर / प्रतिनिधी
प्रतिजैविक उपचार टाळलेले ओझोन थेरपी युक्त दूध बाजारात आणणार असल्याची घोषणा श्री वारणा दूध संघाचे चेअरमन आमदार डॉ. विनय कोरे यानी केली. श्री वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्त धनत्रयोदशीदिनी वारणा दूध संघाच्यावतीने जातीवंत जनावरांचे प्रदर्शन झाले. जनावरांच्या प्रदर्शनातील विजेत्या शेतकऱ्यांना पारितोषिक समारंभात डॉ.कोरे बोलत होते.पशुधनाने वारणा परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी आली आहे त्यामुळे वारणा हे पशुधन विकसीत करणारे देशातील प्रमुख केंद्र ठरावे असे स्वप्न बाळगल्याचे डॉ.विनय कोरे यांनी सांगितले.
परभणीच्या पशू वैद्यकीय महाविद्यालयाचे निवृत्त सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्केडेंय, शिरवळच्या क्रांतीसिंह नाना पाटील पशूवैद्यकीय महाविद्यालयाचे नि.सहयोगी अधिष्ठाता डॉ.विलास आहेर यांच्या हस्ते जनावरांचे प्रदर्शनाचे उद्घाटन झाले या प्रदर्शनात २५० जनावरांचा सहभाग होता. प्रारंभी वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी स्वागत करुन वारणा दूध संघाने दूध उत्पादकांसाठी विविध उपक्रम राबविल्याचे सांगितले.
या परिसंवादात अधिष्ठाता नितीन मार्केडेंय यांनी जनावरांच्या विविध आजारावर प्रतिजैवीके वापरत असल्याने त्याचा अनिष्ठ परिणाम मनुष्यावर होत असल्याने पूढील काळात प्रतिजैविकेचा वापर टाळून ओझन थेरपीचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे. डॉ.विलास आहेर यांनी दूध उत्पादकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देवून भविष्यात दुग्ध व्यवसाय हाच प्रमुख व्यवसाय होणार आहे.