आयपीओसाठी ओयोने केले नेतृत्वबदल
नवी दिल्ली :
पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ओयो यांनी आपल्या आयपीओ आणण्याच्या कार्यक्रमाला वेग दिला आहे. या अंतर्गत कंपनीमध्ये काही जणांना नव्याने सामील करुन घेतले आहे.
कंपनीने आयपीओ सादरीकरणापूर्वी नेतृत्वामध्ये बदल करताना पाच जणांना कंपनीत सामावून घेतले आहे. या संदर्भातील माहिती कंपनीने शेअर बाजाराला शुक्रवारी संध्याकाळी दिली आहे. सीओओ म्हणून सोनल सिन्हा यांना तर युरोपमधील ओयो व्हेकेशन होमस्च्या सीओओपदी रचित श्रीवास्तव यांची नियुक्ती केलेली आहे. या शिवाय शशांक जैन आणि पंखुडी सखुजा यांचीही नियुक्ती कंपनीने केली आहे. आशिष बाजपेई यांची ऑनलाईन ट्रॅव्हलच्या प्रमुखपदी बढती केली आहे. ओयोचे संस्थापक रितेश अगरवाल म्हणाले की, कंपनीला विकासाच्या पथावर नेण्यासाठी आमचे प्रयत्न भविष्यात असणार असून या करिता आवश्यक मनुष्य बळाची पुर्तता केली जात आहे. बाजारातील बदलत्या स्थितीचा अंदाज घेऊन कंपनी व्यवसाय विस्तार व वाढीसाठी प्रयत्न करत आहे.