For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाण्यातील ऑक्सिजनमध्ये होतोय घट

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाण्यातील ऑक्सिजनमध्ये होतोय घट
Advertisement

जगात जितक्या नद्या-नाले, सरोवर-झरे आणि समुद्र आहे, त्यांच्यातील पाण्यात असलेले ऑक्सिजनचे प्रमाण वेगाने कमी होत आहे. हा प्रकार पूर्ण जगासाठी हा एक मोठा धोका आहे, जर असे होत राहिले, तर या जलात राहणारे जंतू धोक्यात सापडणार आहेत आणि त्यानंतर याचा प्रभाव पूर्ण मानव प्रजातीवर पडू लागेल. ज्याप्रकारे वातावरणात ऑक्सिजन आमच्यासाठी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे पाण्यात मिसळलेला ऑक्सिजन (डीओ) स्वस्थ जलीय पर्यावरणासाठी आवश्यक आहे. भले मग ते गोड्या पाण्याचे साठे असो किंवा समुद्र, या दोन्हींशी जीवन निगडित आहे. यात राहणारे जीव-जंतू तोपर्यंत जिवंत आहेत, जोपर्यंत पाण्यात ऑक्सिजन मिसळलेले आहे. जलीय जीवजंतूंचे जीवन आम्हा सर्वांसाठी आवश्यक आहे. पाण्यात मिसळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण अनेक कारणांमुळे कमी होते, उदाहरणार्थ तप्त पाण्यात ऑक्सिजनचे प्रमाण अधिक राहत नाही. ग्रीनहाउस गॅस उत्सर्जनामुळे हवा आणि पाण्याचे तापमान त्याच्या दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक राहते, यामुळे याच्या यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत आहे. पृष्ठभागीय पाणी ऑक्सिजनसारख्या महत्त्वपूर्ण घटकाला कायम ठेवण्यास कमी सक्षम ठरत चालले आहे.

Advertisement

औद्योगिक कचराही कारणीभूत

पाण्यातील ऑक्सिजन कमी करण्यास खते, सांडपाणी आणि औद्योगिक कचऱ्याचेही योगदान आहे. त्यांच्याकडून पाण्यात मिसळलेले ऑक्सिजन शोषून घेतले जात आहे.

Advertisement

पाण्यातील जंतूंवर प्रभाव

ऑक्सिजन कमी होऊ लागल्यावर सुक्ष्मजीवांचे जीवन असह्या होऊ लागते. याचा प्रभाव कालौघात मोठ्या प्रजातींवरही पडतो. सुक्ष्मजीवांची संख्या ऑक्सिजनवर निर्भर नसते, ते मृत कार्बनिक पदार्थांच्या भांडारावर पोसले जात असतात. ज्यामुळे घनत्व इतके वाढते की प्रकाश कमी होतो आणि प्रकाश संश्लेषण देखील अत्यंत मर्यादित होते. ज्यामुळे पूर्ण जलीय संस्था एका दुष्टचक्रात अडकते, याला युट्रोफिकेशन म्हटले जाते. जलीय ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पाणी वेगाने उष्ण होऊ लागते. तर बर्फ वितळल्याने महासागरांमध्ये पृष्ठभागीय लवणतेत कमी येऊ लागते. अलिकडेच काही वैज्ञानिकांनी जलीय ऑक्सिजनच्या कमी होणाऱ्या प्रमाणाबद्दल सतर्कतेचा इशारा दिला आहे.

डेड एरिया वाढतोय

जगातील जलीय संस्थांमध्ये ऑक्सिजनच्या चिंताजनक कमतरतेला डीऑक्सिजनेशनच्या स्वरुपात पाहिले जात आहे. हा प्रकार जलीय पर्यावरण आणि मानवी उपजीविकेसाठी धोक्याचा आहे. यामुळे डेड एरियाचा विस्तार होतो. माशांचे जीवन यामुळे धोक्यात सापडू शकते. तसेच पाण्याच्या गुणवत्तेला  फटका बसू लागतो. डीऑक्सिजनेशनमुळे मासे, शेलफिश आणि अन्य सागरीजीवांचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होऊ शकतो. या ऑक्सिजनरहित क्षेत्रांना ‘मृत क्षेत्र’ म्हटले जाते.

ग्रीनहाउस गॅसेसची निर्मिती वाढणार

गोड्या पाण्याच्या प्रणालींमध्ये कमी ऑक्सिजनची पातळी मायक्रोबियल प्रक्रियांना बदलू शकते, ज्यामुळे संभाव्य स्वरुपात मिथेन आणि नायट्रस ऑक्साइड यासारख्या शक्तिशाली ग्रीनहाउस गॅसांचे उत्पादन वाढू शकते. हे एक धोकादायक फीडबॅक लूप तयार करते, कारण हे गॅसेस जागतिक तापमानवाढीला आणखी वाढविण्यास कारणीभूत ठरतात. याच्या अतिरिक्त किनारी जलामध्ये कमी ऑक्सिजनच्या स्थितीमुळे तळावरील फॉस्फरस मोकळा होण्याची घटना घडू शकते. पोषक तत्व प्रदूषण वाढवून संभाव्य स्वरुपात हानिकारक शेवाळाचे प्रमाण वाढवू शकतात.

1960 पासून वाढली घसरण

पृथ्वीच्या जलात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे चिंताजनक आहे. 1950 च्या दशकापासून महासागरांमध्ये मिसळलेल्या ऑक्सिजनमध्ये 2 टक्क्यांची घट झाली आहे. काही क्षेत्रांमध्ये 20-50 टक्क्यांची गंभीर हानी दिसून आली आहे. किनारी जलात हायपोक्सिक स्थळांच्या संख्येत 1960 पूर्वीच्या 45 वरून वाढत 2011 मध्ये जवळपास 700 इतकी वाढ झाली आहे. गोड्या पाण्याच्या प्रणालींमध्ये स्थिती समान स्वरुपात चिंताजनक आहे. समशीतोष्ण सरोवरे महासागरांच्या तुलनेत वेगाने ऑक्सिजन गमावत आहेत. अनुमानानुसार 2100 पर्यंत सागरी ऑक्सिजनमध्ये आणखी 3-4 टक्क्यांची हानी होऊ शकते.

Advertisement
Tags :

.