For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चंद्राच्या मातीतून मिळविला ऑक्सिजन

06:53 AM Apr 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
चंद्राच्या मातीतून मिळविला ऑक्सिजन
Advertisement

जेफ बेजोस यांच्या कंपनीची कामगिरी

Advertisement

अमेरिकन उद्योगपती जेफ बेजोस यांची कंपनी ब्ल्यू ओरिजिनने एक मोठी कामगिरी केली आहे. ब्ल्यू ओरिजिनने चंद्राच्या धुळीमधून ऑक्सिजन मिळविण्यास यश प्राप्त केले आहे. चंद्रावर दीर्घकाळापर्यंत मानवी जीवनाच्या दिशेने हे एक मोठे  पाऊल मानले जात आहे.

बेजोस यांची कंपनी दीर्घकाळापासून या प्रकल्पावर काम करत होती. चंद्राची माती रेगोलिथमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन असते. ते मिळविणे पृथ्वीवरून जाणाऱ्या पुरवठ्यावरील निर्भरता कमी करू शकते. परंतु हा प्रकल्प सध्या स्वत:च्या प्रारंभिक टप्प्यात आहे.

Advertisement

मातीतून मिळविता येते ऑक्सिजन

ब्ल्यू ओरिजिनने मोल्टन रेगोलिथ इलेक्ट्रोलिसिस नावाच्या तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रियेचा वापर केला. नासा आणि यूरोपीय अंतराळ संस्था देखील यावर संशोधन करत आहेत. यात चंद्राच्या मातीला अत्यंत अधिक तापमानावर द्रव रुप मिळेपर्यंत गरम केले जाते. वितळल्यावर त्यातून वीजेचा प्रवाह सोडला जातो, ज्यामुळे ऑक्सिजन पकडून ठेवणारे केमिकल बाँड तुटतात. यामुळे ऑक्सिजन वायूच्या स्वरुपात बाहेर पडतो आणि तो मग एकत्र केला जातो. केवळ प्रयोगशाळाच नव्ह्s तर चंद्र्रावरील स्थितीही ही प्रक्रिया पूर्ण करता यावी असा प्रयत्न आता वैज्ञानिकांचा आहे. ब्ल्यू ओरिजिन एका अशा प्रणालीवर काम करत आहे, ज्यात पृथ्वीच्या पुरवठ्यावर निर्भर राहण्याऐवजी चंद्रावरील साधनांचा वापर करता येईल.

दीर्घकाळापासून संशोधन

चंद्राच्या मातीत जवळपास 40-45 टक्के हिस्सा ऑक्सिजनने निर्मित असतो. हे सिलिका, आयर्न ऑक्साइड आणि अॅल्युमिनियम ऑक्साइड यासारख्या खनिजांमध्ये फसलेले असते. चंद्रावर या प्रक्रियेला पूर्ण करण्यासाठी अत्यंत अधिक ऊर्जेची गरज आहे. रेगोलिथला 1600 अंशापेक्षा अधिक तापमानावर तप्त करणे आणि इलेक्ट्रोलिसिसची प्रक्रिया सातत्याने कायम राखण्यासाठी अडथळारहित पुरवठ्याची गरज असते.

चंद्रावरील साधनांद्वारे सोलर पॅनेल निर्माण करण्याचाही विचार सुरू आहे. या प्रक्रियेचा मोठा लाभ म्हणजे ऑक्सिजन मिळविल्यावर उर्वरित सामग्री लोह, अॅल्यूमिनियम आणि सिलिकॉन सारखे धातूची असते. यातून चंद्रावर राहण्याचे ठिकाण, अवजार आणि अन्य गोष्टी निर्माण केल्या जाऊ शकतात. चंद्रावर पृथ्वीवरून ऑक्सिजन नेणे अत्यंत महाग असते आणि यामुळे अंतराळवीरही अधिक काळापर्यंत अंतराळात राहू शकत नाहीत.

Advertisement
Tags :

.