For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिवाळीपूर्वी घुबडाची पूजा

06:26 AM Sep 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
दिवाळीपूर्वी घुबडाची पूजा
Advertisement

आपला देश विविध प्रथांनी आणि समजुतींनी भरलेला आहे. या देशातील प्रत्येक प्राचीन लोकवस्तीची आपली अशी एक विशिष्ट परंपरा आहे. सांप्रतच्या विज्ञान युगातही आपल्या श्रद्धा आणि परंपरा यांच्यावरचा बहुतेकांचा विश्वास दृढ आहे. उत्तर प्रदेश राज्यातील शहाजहानपूर भागात अशीची एक विस्मयकारक प्रथा आहे.

Advertisement

आपण घुबड हा पक्षी अशुभ मानतो. त्याचे दर्शनही घेऊ नये, असे मानले जाते. तथापि, या गावात अशी प्रथा आहे, की दीपावलीच्या सणाच्या आधी एक दिवस येथे घुबडाची पूजा केली जाते. अर्थात, हे खरे घुबड नसते. तर घुबडाच्या छायाचित्राची देव समजून पूजा केली जाते. विशेष म्हणजे या शहरातील महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापक एकत्र येऊन ही पूजा करतात. विश्वशांती आणि समृद्धीसाठी ही पूजा केली जाते, असे या प्राध्यापकांचे म्हणणे आहे. ही पूजा पाहण्यासाठी शहरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. वास्तविक दिवाळीच्या काळात लक्ष्मी आणि गणपती या देवतांची पूजा करण्याची परंपरा आहे. तथापि, या शहरात घुबडाला पूजिले जाते. घुबडाची आरतीही केली जाते.

यावर्षीही अशी पूजा केली जाणार आहे. यावेळची पूजा इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपावे, या हेतूने केली जाणार आहे. या शहरातील एक प्राध्यापक अनुराग अग्रवाल यांचे म्हणणे असे की, दहशतवादी संघटना हमासच्या बुद्धीवर एक घुबड बसले आहे. या घुबडाने हमासच्या बुद्धीला बंधक बनविले आहे. त्यामुळे हमासची वर्तणूक अशा प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी होत आहे. यावेळी दीपावलीच्या आधी घुबडाची पूजा केल्याने हमासची बुद्धी संतुलित होईल. हमाच्या बुद्धीला घुबडाची बाधा झाल्याने या दहशतवादी संघटनेने इस्रायलवर दहशतवादी हल्ला करुन अनेक ज्यूंचे बळी घेतले. त्यामुळेच या युद्धाला तोंड फुटले आहे. त्यामुळे हा घुबडपूजनाचा उपाय करुन पाहिला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.