For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅक्सवेलच्या जागी ओवेन

06:30 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
मॅक्सवेलच्या जागी ओवेन
Advertisement

वृत्तसंस्था/ मुलानपूर

Advertisement

सध्या सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱ्या पंजाब किंग्ज संघाने जखमी ग्लेन मॅक्सवेलच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मिच ओवेनला बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे.

ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल याला दुखापत झाली असून तो आता या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही. 26 एप्रिल रोजी इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या सामन्यात मॅक्सवेलला ही दुखापत झाली होती. हा सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. मॅक्सवेल या स्पर्धेत फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत होता. त्याने 7 सामन्यात केवळ 48 धावा जमविल्या होत्या. पंजाब किंग्ज संघाने ऑस्ट्रेलियाचा 23 वर्षीय अष्टपैलू मिच ओवेनला बदली खेळाडू म्हणून संधी दिली आहे. आता ओवेनला पंजाब किंग्ज संघाने 3 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले आहे. टी-20 प्रकारात ओवेनने आतापर्यंत 10 गडी बाद केले असून फलंदाजीत त्याने 34 सामन्यात 646 धावा जमविल्या आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.