कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इन्सुलीत महाराजस्व समाधान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

05:17 PM Apr 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना घेता आला पाहिजे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. आपल्या देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्यांची भुमिका महत्वाची असुन शासनाच्या विविध योजनाचा लाभ त्यांच्या पर्यत पोहचणे गरजेचे आहे. त्यात महसूल विभागाचे काम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांनी केले. ते महसूल विभागच्या वतीने आयोजित क्षेत्रफळ मंडळ मधील सर्व ग्रामस्थांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलतं होते यावेळी व्यासपीठावर इन्सुली सरपंच तात्या वेगुर्लेकर,निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, इन्सुली उपसरपंच वर्षा सावंत, माजी सभापती मानसी धुरी, ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, स्वागत नाटेकर, नमिता नाईक, रामचंद्र चराटकर, क्षेत्रफळ मंडळ अधिकारी मालवणकर, इन्सुली तलाठी भक्ती सावंत, रघुवीर देऊलकर पोलीस पाटील जागृती गावडे आदी सह क्षेत्रफळ मंडळ मधील सर्व तलाठी उपस्थित होते. शिबिराच्या सुरुवातीला शिवसेना तालुकाप्रमुख नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी मंडळ अधिकारी मालवणकर यांनी विविध योजना, जातींचे दाखले, फार्मर आयडी, सामाजिक लाभच्या योजना व विविध योजना दाखले यांची माहिती उपस्थित ग्रामस्थांना दिली. यावेळी ग्रामस्थांच्या विविध समस्या जाणून घेत शंकेचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तलाठी भक्ती सावंत यांनी केले. याशिबिराला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद लाभला.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article