नेरूरपारमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
शहर वार्ताहर/कुडाळ : 'माझे गाव आरोग्य संपन्न गाव अभियान' अंतर्गत शुक्रतारा कला क्रीडा मंडळ (नेरूरपार), वसुंधरा सार्वजनिक विश्वस्त न्यास (नेरूरपार), कोकण कला व शिक्षण विकास संस्था, ग्रामपंचायत नेरूर देऊळवाडा आणि आयुष्मान आरोग्य मंदिर (नेरूर क्र. २) यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूरपार वसुंधरा विज्ञान केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांची या शिबिराला प्रमुख उपस्थिती होती. या शिबीराला विविध उपक्रम व मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. रक्त तपासणी, शुगर (साखर), हिमोग्लोबिन तपासणी,
रक्तदाब (BP) व मधुमेह तपासणी
छाती व श्वसन तपासणी, नेत्र तपासणी आदी तपासण्या व मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात आली.
यावेळी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, तंत्रज्ञ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची अत्यंत गरज असून, भविष्यातही सामाजिक हिताचे उपक्रम राबविले जातील, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.