लोकमान्यच्या सत्काराने भारावलो!
द एक्स नेव्ही पर्सन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा मालवण लोकमान्य तर्फे सत्कार
मालवण । प्रतिनिधी
नौसेना दिनाच्या निमित्ताने आज मालवणमध्ये येण्याचा योग आला. लोकमान्य सोसायटी मालवण शाखेने आजच्या दिवशी द एक्स नेव्ही पर्सन पदाधिकाऱ्यांचा जो सत्कार केला आहे. त्या सत्काराने आम्ही सर्वजण भारावून गेलो आहोत. लोकमान्यने उत्तरोत्तर आपली प्रगती करावी, असे प्रतिपादन द एक्स नेव्ही पर्सन असोसिएशन बेळगावीचे सेक्रेटरी राजीव साळुंखे यांनी लोकमान्य मल्टीपर्पज को. सोसायटी मालवण शाखा येथे बोलताना केले.
नौसेना दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने द एक्स नेव्ही पर्सन असोसिएशन बेळगावीचे पदाधिकारी व सदस्य हे मालवण येथे आले होते. यावेळी त्यांनी लोकमान्यच्या मालवण शाखेला भेट दिली. याप्रसंगी लोकमान्य मालवण शाखेच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व कोकणी मेव्याची भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी द एक्स नेव्ही पर्सन असोसिएशन बेळगावचे अध्यक्ष अशोक पाटील, सेक्रेटरी राजीव साळुंखे, ॲडव्हायझर जगदीश पाटील, कार्यक्रम आयोजक दत्तात्रय जाधव, लोकमान्यचे वरिष्ठ शाखाधिकारी नित्यानंद मांजरेकर, असिस्टंट ब्रांच मॅनेजर निखिल मुणगेकर, अकाउंट असिस्टंट तेजस्विनी बागवे, सुनील रासम, सत्यजित लंगोटे आदी उपस्थित होते.