For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणचे सरकार उलथवून लावा

06:36 AM Mar 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
इराणचे सरकार उलथवून लावा
Advertisement

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे इराणी जनतेला आवाहन

Advertisement

वॉशिंग्टन :

इराणवर जोरदार वायुहल्ला केल्यानंतर आता अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणच्या जनतेलाच तेथील धर्मांध प्रशासनाच्या विरोधात उठाव करण्याचे आवाहन केले आहे. हे सरकार उलथवून टाका, असा संदेश त्यांनी इराणच्या जनतेला दिला आहे. आपल्यासाठी ही अखेरची संधी आहे. हे सरकार आपण कोसळवू शकता. अमेरिका आपल्या पाठीशी आहे. आम्ही केलेला हल्ला इराणच्या जनतेला संकटात टाकण्यासाठी केला नसून इराणच्या जनतेची या प्रशासनाच्या कचाट्यातून सुटका करण्यासाठी केला आहे. या संधीचा लाभ इराणच्या जनतेने घ्यावा आणि सरकारविरोधात आंदोलन तीव्र करावे. यासारखी संधी इराणच्या जनतेला नंतर कधी मिळणार नाही. आम्ही इराणच्या सरकारी आस्थापनांवर हल्ले करत आहोत. आमचे हल्ले संपले, की इराणच्या जनतेने रस्त्यावर उतरावे, सरकार पाडवावे आणि आपल्या हिताचे रक्षण करणारे सरकार स्थापन करावे, अमेरिका आपल्याला शक्य तितके सर्व साहाय्य करण्यास सज्ज आहे. आता इराणच्या जनतेने आपले स्वातंत्र्यप्राप्तीचे ध्येय पूर्ण करावे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.