Kolhapur : नृसिंहवाडीत तीन लाखांवर भाविकांनी घेतले दत्त दर्शन !
भाविकांच्या गर्दीने नृसिंहवाडी फुलले : वाहतुकीची कोंडी
नृसिंहवाडी : दिवाळीच्या सलग सुट्ट्यामुळे देशभरातून आलेल्या सुमारे तीन लाखावर भाविकांनी दत्त दर्शनाचा लाभ घेतला. बुधवारपासून रविवार अखेर सातत्याने नृसिंहवाडी क्षेत्र भाविकांच्या गर्दीने गजबजले होते. मंदिरातील पहाटेच्या काकड आरती पासून ते रात्रीच्या शेजारती पर्यंत मंदिर दक्षिण उत्तर घाट भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
सलग सुट्ट्यांच्या गर्दीमुळे नृसिंहवाडी हाउसफुल झाली होती. प्रसिद्ध मिठाई व्यापार पेठेत यामुळे मोठी उलाढाल झाली. तर सर्व प्रकारचे यात्री निवास लॉजिस खानावळ हॉटेल्स येथेही भाविकांची मोठी गर्दी होती. दत्त दर्शन घेऊन हजारो भाविकांनी येथे विस्तीर्ण कृष्णा पात्रात नौका विहाराचा हे आनंद लुटला. एसटी बसेस सह खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी होती. चार चाकी वाहनांचे बहुमजली पार्किंग असून देखील पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे अनेक भाविक पर्यटकांनी आपल्या चार चाकी गाड्या रात्रीच्या वेळी बस स्थानक परिसरात तर दिवसा शिरोळ कुरुंदवाड मार्गावर रस्त्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वेगवेगळ्या दर्शन रंगांचे व्यवस्था करण्यात आली होती.
वाहतूक नियंत्रक पोलिसाची गरज...!
नृसिंहवाडी येथे सातत्याने बाढणारी भाविकांची गर्दी यामुळे सार्वजनिक सुट्ट्या गुरुवार, शनिवार, रविवार पौर्णिमा, अमावस्या अशा विशिष्ट दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत असते. या दिवाळीच्या सुट्टीतही हा अनुभव वाहनधारकांना आला.
येथे स्वागत कमानी जवळ मुख्य मार्गावर रस्त्यावर बेशिस्तपणे केलेले वाहन पार्किंग व बाहेरगावाहून येणाऱ्या व गावातून बाहेर जाणाऱ्या एसटी बसेस चार चाकी वाहने यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. गर्दी अपेक्षित असताना वाहतूक नियंत्रक पोलिसाची नेमणूक येथे न केल्यामुळे सातत्याने वादावादीचे प्रसंग घडत होते. ग्रामपंचायत कर्मचारी सातत्याने ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आले मात्र वाहतूक नियंत्रक पोलिसाचा धाक आहे तो र कर्मचाऱ्याकडे नसल्यामुळे ही वाहतुकीची कोंडी वे सातत्याने वाढत होती.