For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दहावी परीक्षेसाठी राज्यभरात 9 लाखांहून अधिक विद्यार्थी

06:48 AM Mar 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
दहावी परीक्षेसाठी राज्यभरात 9 लाखांहून अधिक विद्यार्थी
Advertisement

15,941 केंद्रांवर आजपासून परीक्षेला प्रारंभ

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दहावी वार्षिक परीक्षेला बुधवार 18 मार्चपासून प्रारंभ होत आहे. परीक्षेसाठी यंदा 9,02,889 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 8,12,855 विद्यार्थी प्रथमच दहावीची परीक्षा देणार आहेत.

Advertisement

दहावी परीक्षा-1 साठी राज्यभरात 15,941 परीक्षा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. सकाळी 10 ते दुपारी 1:15 पर्यंत पेपर होतील. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी कर्नाटक शालेय परीक्षा  आणि मूल्यमापन मंडळाने सज्जता केली आहे.

प्रश्नपत्रिका फुटू नयेत यासाठी परीक्षा केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे तसेच परिसरातील झेरॉक्स दुकाने, सायबर सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून वेब कास्टिंगद्वारे नजर ठेवली जाईल. परीक्षा केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, कॅलक्युलेटर, स्मार्ट वॉचवर निर्बंध घालण्यात आले आहेत. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दहावी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Tags :

.