स्पेनमध्ये रेल्वे अपघातानंतर संतापाचा उद्रेक
दुर्घटनेत 68 जणांचा मृत्यू : राजधानी माद्रिदमध्ये निदर्शने
वृत्तसंस्था/माद्रिद
स्पेनमध्ये दोन हायस्पीड रेल्वे गाड्यांची टक्कर होऊन 68 जणांचा मृत्यू झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. गुऊवारी राजधानी माद्रिदमध्ये शेकडो नागरिकांनी सरकारविरोधात निदर्शने केली. या वेळी आंदोलकांनी परिवहनमंत्री ऑस्कर पुएंते यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष झाला. आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने बाटल्या आणि फटाके फेकले, तर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला.
प्राथमिक माहितीनुसार, रेल्वे सुरक्षा किंवा सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर नियंत्रण केंद्राने एका गाडीला पुन्हा प्रवास सुरू करण्याची परवानगी दिली. पुढे ऊळांवर उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीला तिची धडक बसली. मात्र, सिग्नल यंत्रणेतील बिघाड हेच अपघाताचे नेमके कारण होते का, याची अधिकृत पुष्टी तपासानंतरच होणार आहे. परिवहनमंत्री पुएंते यांनीही चौकशीनंतर अपघाताचे कारण आणि जबाबदारी निश्चित केली जाईल, असे स्पष्ट केले.
रात्रभर बचावकार्य सुरू
अपघातानंतर बचाव पथकांनी रात्रभर दुर्घटनाग्रस्त गाड्यांच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या प्रवाशांचा शोध घेतला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी व्रेनची मदत घेण्यात आली. अपघातामुळे स्पेनच्या रेल्वे व्यवस्थेतील सुरक्षा उपायांवर प्रŽ उपस्थित होत आहेत.
पंतप्रधानांकडून चौकशीचे आश्वासन
स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी दुर्घटनास्थळाजवळून देशाला संबोधित करत मृतांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त केल्या. अपघाताच्या चौकशीत निष्काळजीपणा किंवा सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. गरज भासल्यास रेल्वे सुरक्षेचे नियम अधिक कठोर करण्याचे संकेतही त्यांनी दिले.
