For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हाजगोळीतील चाळोबा टेकडी परिसरातील धरणात गणेशपूरच्या युवकाचा बुडून मृत्यू

06:55 AM May 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
हाजगोळीतील चाळोबा टेकडी परिसरातील धरणात गणेशपूरच्या युवकाचा बुडून मृत्यू
Advertisement

त.भा. वार्ताहर

Advertisement

तुडये : मूळचा हाजगोळी येथील रहिवासी आणि सध्या गणेशपूर-बेळगाव येथे वास्तव्यास असलेल्या युवकाचा हाजगोळी (ता. चंदगड) येथील चाळोबा देवालय टेकडी परिसरातील तिलारी धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सायं. 5 वाजण्याच्या सुमारास घडली. ओमकार नामदेव पाटील (वय 24) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. ओमकार हा गणेशपूर येथील युवक पार्टीसाठी आपल्या अन्य दोन मित्रांसह चाळोबा टेकडी परिसरात गेला होता. जेवण केल्यानंतर मित्रांसह पाण्यात पोहण्यास उतरला. पोहताना खाली पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. ओमकार बुडाल्याने सोबतच्या दोन्ही मित्रांनी पाण्याबाहेर येत आजूबाजूला कोणी वाचविण्यासाठी आहे काय पाहिले. मात्र परिसरात कोणीच नसल्याने त्यांनी हाजगोळी येथे माहिती दिल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली. रात्री 10.15 वाजता मृतदेह आढळला. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे. गणेशपूर, बेळगाव येथील तेजस्विनी गॅस वितरण करणाऱ्या एन. डी. पाटील यांचा तो मुलगा होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.