जर्मनीत ‘एअरपोर्ट मलेरिया’चा प्रकोप
2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू : विमानातून आले मच्छर
वृत्तसंस्था/फ्रँकफर्ट
जर्मनीतील सर्वात व्यग्र फ्रँकफर्ट विमानतळावर एक दुर्लभ ‘एअरपोर्ट मलेरिया’चा प्रकोप समोर आला आहे. विमानतळ संचालक ‘फ्रापोर्ट’ आणि आरोग्य अधिकाऱ्यानुसार जुलैपासून आतापर्यंत एकूण 6 कर्मचारी संक्रमित आढळून आले असून यातील 2 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हे संक्रमण एखाद्या आंतरराष्ट्रीय विमानातून पोहोचलेल्या एनोफिलिज मच्छरांनी चावल्यामुळे झाल्याचे अधिकाऱ्यांचे मानणे आहे. ‘एअरपोर्ट मलेरिया’ अत्यंत दुर्लभ स्थिती असून यात मलेरिया प्रभावित क्षेत्र म्हणजेच सब-सहारा आफ्रिकेतून येणाऱ्या विमानो•ाणांद्वारे मच्छर अशा देशांच्या विमानतळांपर्यंत पोहोचतात, जेथे मलेरियाचा प्रकोप नसतो किंवा अत्यंत कमी असतो. हे मच्छर मग तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चावून संक्रमण फैलावतात.
संक्रमित झालेल्या कर्मचाऱ्यांनी अलिकडच्या काळात कुठल्याही मलेरिया प्रभावित देशाचा प्रवास केला नव्हता, यातून त्यांना संक्रमण विमानतळ परिसरातही मिळाल्याचे स्पष्ट झाले असे रॉबर्ट कोच इन्स्टीट्यूटकडून सांगण्यात आले. गैर-स्थानिक देशांमध्ये डॉक्टरांकडून प्रारंभिक स्तरावर मलेरियाचा संशय व्यक्त न होणे मृत्यूचे एक मोठे कारण ठरते. पहिल्या रुग्णाच्या मृत्यूनंतरच मलेरियाच्या लागणाची पुष्टी होऊ शकली होती.
जर्मनीत मलेरियाचा धोका अत्यंत कमी
जर्मनीतही अनेक प्रकारचे मच्छर असतात, तसेच तेथे मलेरिया फैलावणारे एनोफिलिज मच्छरही आढळून येतात. परंतु स्थानिक स्वरुपात मलेरियाचा धोका अत्यंत कमी आहे, कारण जर्मनीत मलेरियाचा फैलाव जवळपास संपुष्टात आला आहे. जर्मनीत मच्छरांच्या 53 प्रजाती असून यातील 9 प्रजाती मलेरिया फैलावणाऱ्या मच्छरांच्या आहेत, ज्या विविध हिस्स्यांमध्ये फैलावलेल्या आहेत. परंतु त्यांचा प्रभाव अत्यंत कमी आहे.
स्थानिक स्तरावर फैलाव नाही
19 व्या-20 व्या शतकात जर्मनीत मलेरिया एंडेमिक होता, खासकरून दलदलयुक्त भागांमध्ये. 1950-60 मध्ये मलेरिया उर्न्मूलन कार्यक्रमानंतर एंडेमिक मलेरिया संपुष्टात आला. वर्तमानात जर्मनीत स्थानिक स्वरुपात मलेरियाचा फैलाव होत नाही. दरवर्षी तेथे 1 हजाराहून अधिक मलेरियाचे रुग्ण प्रवाशांच्या माध्यमातून समोर येतात, परंतु स्थानिक स्तरावर हे फैलावत नाही. एअरपोर्ट मलेरियाची 1969-2024 पर्यंत पूर्ण जगात 145 प्रकरणे समोर आली, यातील 9 जर्मनीमधील आहेत.