पत्रकार तेजस देसाई यांना साईकृपा दिव्यांग संस्थेचा पुरस्कार जाहीर
दोडामार्ग – वार्ताहर
समाजातील तळागाळात गाव ते सामाजिक विकास प्रक्रियेत हातभार लावणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा साईकृपा दिव्यांग, निराधार, गरजू संघ कोलझर - दोडामार्ग यांनी शोध घेऊन त्यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्याचे ठरविले आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींचा हा सन्मान सोहळा पुरस्कार स्वरूपात लवकरच होणार असून नावांची घोषणा अध्यक्ष -साबाजी सावंत, सचिव धारिणी देसाई, उपाध्यक्ष मंदोदरी देसाई व संघटनेचे सर्व संचालक यांनी केली आहे. साईकृपा दिव्यांग, निराधार, गरजू संघ कोलझर - दोडामार्ग ही संघटना तालुक्यात सामाजिक उपक्रम घेण्यात नेहमी पुढे असते. अशावेळी समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरवही संस्था करीत असते. यावर्षीचे क्षेत्रनिहाय पुरस्कार असे आहेत.दैनिक तरुण भारत संवादचे दोडामार्ग पत्रकार तेजस तुकाराम देसाई , श्रीम. प्रज्ञा परब (सामाजिक कार्यकर्त्या वेंगुर्ला), शिवानंद उर्फ शैलेश भोसले (उद्योजक गोवा-दोडामार्ग), श्रीनिवास सुरेश गवस (वकील सावंतवाडी), नंदकुमार गजानन नाईक (आदर्श मुख्याध्यापक, मुख्याध्यापक खेमराज बांदा हायस्कूल), सागर पांगुळ (कोलझर, हायस्कूल शिक्षक), डॉ. उमा मिहीर प्रभुदेसाई (वैद्यकीय, कोलगाव सावंतवाडी), श्रीम. शरयू परब (कोलझर, जि. प. शाळा शिक्षिका), श्यामराव अनंत देसाई (नाट्य क्षेत्रातील उत्कृष्ट दिग्दर्शक ), प्रभाकर झिलू देसाई (कृषि बागायतदार) यांच्या नावांचा सामावेश असल्याचे अध्यक्ष साबाजी सावंत यांनी सांगितले.