आमचा ‘केतन’ गेला... आता चर्चेला पूर्णविराम द्या!
बंधू डॉ.कौतुक भाटीकर यांचे आवाहन
फोंडा : डॉ. केतन भाटीकर यांच्या निधनानंतर समाज माध्यमावर ज्या उलट सुलट चर्चा चाललेल्या आहेत. त्याचा आमच्या कुटुंबाला खूप त्रास होत आहे. कृपया या विषयाला पूर्णविराम द्यावा. आमचा केतन गेला, त्या क्षणापासून आमच्यासाठी राजकारण संपले आहे. तो काही पुन्हा येणार नाही. त्यामुळे कुणीही त्याच्या मरणावर राजकारण कऊ नये, असे आवाहन त्यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. कौतुक भाटीकर व कुटुंबीयांनी केले आहे. फोंड्यातील समाजकार्यकर्ते व तऊण नेते डॉ. केतन भाटीकर यांचा 15 रोजी झालेला मृत्यू आमच्या सर्वांसाठीच धक्कादायक आहे. या कठिण प्रसंगी त्याचे असंख्य चाहते, हितचिंतक यासह सर्वांनीच जी सहानुभूती व्यक्त कऊन धीर दिला त्याबद्दल भाटीकर कुटुंबीय सर्वांचे ऋणी आहे. त्याच्या निधनानंतर समाज माध्यमांवऊन ज्या उलट सुलट चर्चा व प्रतिक्रिया उमटत आहेत, त्याचा आम्हाला खूप त्रास होत आहे. आम्हाला कुणावरच संशय घ्यायचा नाही किंवा या घटनेची कसलीच चौकशी नको आहे. केतन भाटीकर यांच्याबद्दल प्रेम व आदर असल्यास त्यांचे समाजकार्य पुढे नेण्यासाठी आम्हाला सहकार्य करा, असे आवाहन डॉ. कौतुक भाटीकर यांनी कुटुंबीयासह एका व्हिडिओ क्लीपच्या माध्यमातून केले आहे.