For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिकनांच्या रक्षणासाठी आमची लढाई

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमेरिकनांच्या रक्षणासाठी आमची लढाई
Advertisement

अमेरिकेच्या संसदेत नेतान्याहू यांचे संबोधन

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

इस्रायल-हमास यांच्यात 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धादरम्यान पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू हे पहिल्या विदेश दौऱ्याच्या अंतर्गत अमेरिकेत पोहोचले आहेत. तसेच त्यांनी अमेरिकेच्या संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित केले आहे. पंतप्रधान नेतान्याहू यांना अमेरिकेच्या संसदेत 2 मिनिटे 16 सेकंदांपर्यंत स्टँडिंग ओवेशन देण्यात आले. यादरम्यान काही खासदारांनी विरोधात घोषणाबाजी केली. 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेला हल्ला हा अमेरिकेवर 9/11 च्या हल्ल्यासमान होता. हमासच्या राक्षसांनी आमच्या महिलांवर बलात्कार केले, पुरुषांचे शीर कापले आणि   मुलांना जिवंत जाळले. हमासच्या दहशतवाद्यांनी 255 जणांना खेचून गाझाच्या अंधाऱ्या कैदखान्यांमध्ये नेण्यात आले होते, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

Advertisement

जेव्हा आम्ही इराणविरोधात लढतो, तेव्हा आम्ही एका मारेकरी देशाच्या विरोधात लढत असतो. इराण हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू आहे. आम्ही केवळ आमची नव्हे तर अमेरिकेची देखील रक्षा करत आहोत.   या युद्धात आम्ही विजयाच्या समीप आहोत असे उद्गार नेतान्याहू यांनी काढले आहेत. अमेरिकेच्या संसदेबाहेर निदर्शने करणारे लोक इराणसमर्थक आणि त्याचे हस्तक आहेत. तसेच ते सर्व मूर्ख आहेत. युद्ध संपल्यावर गाझामध्ये जे प्रशासन येईल, त्याने कधीच इस्रायलला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करू नये ही आमची मागणी आहे. अमेरिकेच्या सैन्याने मदत वाढविली तर आम्ही युद्ध लवकर संपवू, असे नेतान्याहू यांनी म्हटले आहे.

इराण हा अमेरिकेचाही शत्रू

इस्रायलचा शत्रू हा अमेरिकेचा शत्रू आहे. इस्रायलची लढाई ही अमेरिकेची लढाई आहे आणि इस्रायलचा विजय हा अमेरिकेचा विजय असेल. इस्रायलची ही लढाई क्रौर्य आणि संस्कृतीमधील लढाई आहे. एकीकडे असे लोक आहेत जे मृत्यूची पूजा करत आहेत तर दुसरीकडचे लोक जीवनाला पवित्र मानतात. संस्कृतीच्या या लढाईत अमेरिका आणि इस्रायलने एकत्रितपणे उभे ठाकण्याची गरज असल्याचे नेतान्याहू यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.