महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘डीएनए’ चाचणीची आपली मागणी घटनेनुसार, चर्चच्या परंपरेला धरुनच

01:10 PM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांच्याकडून काऊंटर कम्पलेंट

Advertisement

पणजी : फ्रान्सिस झेवियरच्या शवाची डी. एन. ए. चाचणी करावी, अशी मागणी आपण केल्याबद्दल ओल्ड गोवा पोलिसस्थानकावर सांखवाळ आंदोलनात गुंतलेल्या एका विशिष्ट गटाने तक्रार केल्यानंतर काल गुरुवारी हिंदू रक्षा महाआघाडीचे राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक तसेच ओल्ड गोवा पोलिसस्थानकात ‘काऊंटर कम्पलेंट’ दाखल केली आहे. माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव यांनीही काल गुरुवारी कोलवा पोलिसस्थानकात याबाबत तक्रार नोंद केली असून वेलिंगकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी वालंका आलेमाव व इतर समर्थक उपस्थित होते. वेलिंगकर यांनी केलेल्या ‘काऊंटर कम्पलेंट’ मध्ये त्यांनी म्हटले आहे की, घटनेच्या चौकटीतच बसणाऱ्या अधिकारात आपण ही मागणी केलेली असताना आपली व्यक्तिगत बदनामी करण्यात आलेली आहे.

Advertisement

राणीची केली होती डीएनए 

400 वर्षांपूर्वी ठार मारली गेलेली जॉर्जियाची राणी केटेव्हान हिच्या अवशेषांचा शोध ओल्ड गोवा येथेच ‘ऑगस्टीन टॉवर’ भूमीत सरकार व चर्चच्या रितसर परवानगीने उत्खनन करून घेतला गेला. चर्चच्या संमतीने त्या राणीच्या अवशेषांचे डीएनए टेस्ट करून ते अवशेष राणीचेच होते हे सिद्ध झाल्यावर 10 जुलै 2021 रोजी भारत सरकारने सन्मानपूर्वक ते जॉर्जियाच्या सरकारच्या स्वाधीन केले. या राणीला ‘सेंट’ पद देण्यात आलेले होते. एका ‘सेंट’ला एक न्याय आणि दुसऱ्या  ‘सेंट’च्या बाबतीत मात्र धार्मिक सलोखा कसा व का बिघडतो? संशयाचा कायमचा  सोक्षमोक्ष लावावा, असे चर्चला वाटू नये का? असा सवाल वेलिंगकर यांनी उपस्थित केला आहे. अत्याधुनिक उपकरणांच्या सहाय्याने एकदा हे शव झेवियरचे आहे हे सिद्ध व्हायला का नको? एवढे खवळण्याचे कारण काय? असा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मागणी करणे गैर ठरत नाहीच, असे त्यांचे ठाम मत आहे.

डीएनए टेस्ट ही चर्चची परंपरा

डीएनए टेस्टची मागणी जुनीच आहे. शिवाय ‘सेंट’ म्हणून चर्चची मान्यता मिळालेल्या व्यक्तीच्या अवशेषांची डीएनए टेस्ट करून देण्याची चर्चची परंपरा आहे, हे आपली बदनामी करणाऱ्यांनी विसरु नये, असे वेलिंगकर यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article