...अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडू
शेतकरी संघटनांचा हेस्कॉमला इशारा, विविध मागण्यांसाठी अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर छेडले आंदोलन
बेळगाव : कृषी पंपसेटला आधार क्रमांक जोडण्याची प्रक्रिया त्वरित रद्द करावी, त्याचबरोबर अक्रमसक्रम योजना पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रयत संघ व हसीरू सेनेच्यावतीने बुधवारी व्यापक आंदोलन करण्यात आले. नेहरुनगर येथील हेस्कॉमच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे धरत शेतकऱ्यांनी आपला निषेध नोंदविला. राज्याच्या विद्युत विभागाकडून मागील महिनाभरापासून कृषी पंपसेटला आधार नोंदणी केली जात आहे. आधार नोंदणी करून भविष्यात ग्राहकांना वीजबिल देण्याची तयारी राज्य सरकारची आहे. त्याचबरोबर यापूर्वी अक्रमसक्रम योजना सुरू असल्याने शेतापर्यंत विद्युतखांब घालून शेतकऱ्यांना वीजपुरवठा दिला जात होता.
अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच मांडल्या भोजनासाठी चुली...
अधीक्षक अभियंता प्रवीणकुमार चिकार्डे यांनी निवेदन स्वीकारत आपण शेतकऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. परंतु, ठोस आश्वासन दिले जात नाही तोवर माघार घेणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करत अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच ठाण मांडून आपल्या दुपारच्या भोजनाच्या चुलीही मांडल्या.