For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परराज्यात जाणाऱ्या श्रीमूर्तींची रंगरंगोटी

11:08 AM May 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
परराज्यात जाणाऱ्या श्रीमूर्तींची रंगरंगोटी
Advertisement

महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेशातूनही मागणी

Advertisement

बेळगाव : गणेशमूर्ती घडविणारे गाव म्हणून बेळगावची नवी ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे बेळगावमध्ये वर्षभर गणेशमूर्ती घडविल्या जातात. गणेशचतुर्थीसाठी अद्याप तीन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिकारांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या गणेशमूर्ती तयार करून त्या पाठविण्याकडे मूर्तिकारांचा कल आहे. बेळगावसह परिसरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असतो. त्यात बेळगावच्या गणेशमूर्तींची वेगळीच ओळख आहे. नाविन्यपूर्ण व भव्यदिव्य गणेशमूर्ती साकारण्यात बेळगावच्या मूर्तिकारांचा हातखंडा आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व आंध्रप्रदेशातूनही बेळगावच्या गणेशमूर्तींना मागणी असते. भाविकांच्या मागणीनुसार शाडू तसेच पीओपी गणेशमूर्ती घडविल्या जातात. मागील काही वर्षांपासून मोठ्या मूर्तींसोबत लहान मूर्तीही गोवा तसेच कर्नाटकातील इतर भागांत पाठविल्या जात आहेत. 7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अद्याप तीन महिन्यांचा कालावधी असला तरी मूर्तिकार आतापासूनच गणेशमूर्ती घडवत आहेत. जसजसा गणेशोत्सव जवळ येईल तसतसे मूर्तींना रंगकाम करून अंतिम रूप देण्यात येईल. त्यामुळे सध्या मूर्तिशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.