ओटवणे हायस्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
कु तन्वी ज्ञानेश्वर गावकर ९७.८० टक्के घेत प्रथम
ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरचा शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेला बसलेले सर्व ३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून प्रथम क्रमांक तन्वी ज्ञानेश्वर गावकर ९७.८० % (५०० पैकी ४८९ गुण) द्वितीय क्रमांक साक्षी सखाराम गावकर आणि रिया संतोष सावंत प्रत्येकी ९६ % (५०० पैकी ४८० गुण) तृतीय क्रमांक तन्वी चंद्रकांत गावकर ९२.८० % (५०० पैकी ४६४ गुण) या विद्यार्थ्यांनी पटकाविला. तर विशेष श्रेणीत २३ विद्यार्थी, प्रथम श्रेणीत ९ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष वामन कविटकर, सचिव राजाराम वर्णेकर, उपाध्यक्ष बाबाजी गावकर खजिनदार मनोहर मयेकर, सर्व संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक राजेंद्र देसाई, शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.