ओटवणेत भरवस्तीत दहा फुटी अजगर; प्राणीमित्रांनी केले जेरबंद
03:03 PM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
ओटवणे : ओटवणे येथील करमळगाळूवाडी परिसरात शुक्रवारी रात्री सुमारे दहा फूट लांबीचा अजगर भरवस्तीत आल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मुख्य रस्ता ओलांडून अजगर वस्तीच्या दिशेने जात असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
Advertisement
ग्रामस्थांनी तातडीने प्राणीमित्र विनायक वर्णेकर आणि ओंकार परब यांना घटनास्थळी बोलावले. दोन्ही प्राणीमित्रांनी सुरक्षितपणे अजगराला पकडले. अजगराला पाहण्यासाठी घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी झाली होती.
अजगराला कोणतीही इजा न करता त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यामुळे करमळगाळूवाडीतील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
Advertisement
Advertisement