ओटवणे शाळेचा तिन्ही स्पर्धा परीक्षांचा १०० टक्के निकाल
शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम
ओटवणे प्रतिनिधी
ओटवणे गवळीवाडी शाळा नं ३ चा सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च, बीडीएस , एपीजे अब्दुल कलाम व यशवंत शिष्यवृत्ती स्पर्धा या तिन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला असून या शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च या स्पर्धा परीक्षेत या शाळेतील कु वर्धन दशरथ शृंगारे याने १६६ गुण मिळवून गोल्ड मेडल तर बीडीएस परीक्षेत १०० पैकी ९० गुण मिळवून ब्राँझ मेडल पटकावले. कु रुंजी रघुनाथ कोटकर हिने एसटीएस परीक्षेत १५६ गुण मिळवून गोल्ड मेडल, यशवंत शिष्यवृत्ती परीक्षेत गोल्ड मेडल तर एसटीएस परीक्षेत सिल्वर मेडल पटकावले. या शाळेतील कु नक्ष मनोज दाभोलकर याने गोल्ड मेडल, कु अथर्व सुधीर शृंगारे याने सिल्वर मेडल, समर्थ समित बुराण याने ब्रांझ मेडल पटकावले. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका वैभवी सावंत आणि शिक्षिका सुरेखा चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे माजगाव केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत आणि ओटवणे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण यांनी यानी शाळेत जाऊन या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.