ओसाका दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/ बीजिंग
माजी अग्रमानांकित जपानच्या नाओमी ओसाकाने चायना ओपन स्पर्धेची दुसरी फरी गाठताना इटलीच्या लुसिया ब्रॉन्झेटीवर सहज विजय मिळविला.
चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या ओसाकाने ब्रॉन्झेटीवर 6-3, 6-2 असा विजय मिळविला. 2019 मध्ये ओसाकाने ही स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर चार वर्षे ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. ओसाकाची पुढील लढत कझाकच्या 21 व्या मानांकित युलिया पुतिनत्सेव्हाशी होईल. अमेरिकेच्या सोफिया केनिनेही दुसरी फेरी गाठताना रोमानियाच्या अॅना बॉग्डनवर 7-5, 6-2 अशी मात केली. या स्पर्धेत अमेरिकेच्या विक्रमी 15 टेनिसपटूंनी भाग घेतला आहे. तिची दुसरी लढत बाराव्या मानांकित डायना श्नायडरशी होईल. अमेरिकेच्या टेलर टाऊनसेंडने मार्टिना ट्रेव्हिसनचा 6-2, 4-6, 6-3, चीनच्या वांग झिनयूने जपानच्या माइ होन्तामाचा 6-1, 6-3, युलिया स्टारोडुबत्सेव्हाने लॉरा सीगमंडचा 6-4, 7-6 (7-3) असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.