For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे उद्या अस्थिरोग तपासणी

10:07 AM Feb 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे उद्या अस्थिरोग तपासणी
Advertisement

टिळकवाडी येथे गुडघे, सांधेदुखी, खुबा, संधिवात  ऊग्णांची डॉ. नरेंद्र वैद्य तपासणी करणार : सर्वसामान्यांना उपचार मिळावेत यासाठी कार्यरत

Advertisement

बेळगाव : पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखी आणि सांधेदुखीच्या ऊग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय किर्तीचे सांधेरोपण तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य हे शुक्रवार दि. 1 मार्च  2024 रोजी सकाळी 8.30 वाजता दक्षता हॉस्पिटल, खानापूर रोड, तिसऱ्या रेल्वे गेटजवळ, टिळकवाडी बेळगाव येथे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच इतर हाडाचे दुखीने त्रस्त असणाऱ्या ऊग्णांची तपासणी करणार आहेत. डॉ. नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. विविध गावात सुपर स्पेशालिटी ओपीडी आयोजित करून ऊग्णांना गुडघेदुखी, खुब्याचे तसेच मणक्मयांच्या विकाराविषयी मार्गदर्शन करणे, अत्याधुनिक उपचाराची माहिती व तपासणी केली जात आहे. ऊग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट, एक्सरे आणि अन्य काही रिपोर्ट आपल्या सोबत आणणे आवश्यक आहे. गुडघेदुखी ही समस्या ही आता ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित न राहता तऊणांमध्येही मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या वजनामुळे गुडघ्याच्या समस्यांनी अधिकच गुडघेदुखी होते.

गुडघ्याची तपासणी प्रारंभीच केल्यास उत्तम

Advertisement

गुडघ्याची तपासणी जर सुऊवातीच्या अवस्थेत केली तर औषधे व्यायामांनी आराम होतो. पण जर गुडघ्यातील कुर्चेची झीज झाली असेल तर मात्र आजकाल दुर्बिणीद्वारे उपचार, पी आर पी इंजेक्शन याद्वारे करता येतात. अंतिम टप्प्यातील झीज, पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो. यात आता आमुलाग्र बदल होऊन रोबोटीकचा सहभाग यशस्वी ठरतो आहे. ही यंत्रणा भारतात आणून ऊग्णांना उपलब्ध करून देणारे विख्यात तज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य स्वत: ऊग्णांची तपासणी करणार आहेत.

12,000 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी

डॉ. नरेंद्र वैद्य हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गुडघेरोपण आणि मणक्मयाचे तज्ञ म्हणून ओळखले जातात. पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल प्रा. लि. चे ते कार्यकारी संचालक आहेत. जगातील दहा देशात त्यांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या आहेत. 45,000 हून अधिक गुडघेरोपण शस्त्रक्रिया 12,000 रोबोटीक तंत्रज्ञानाचा वापर करून आणि 1,50,000 हून अन्य अस्थिरोग शस्त्रक्रिया त्यांनी केल्या आहेत. रोबोटीक शस्त्रक्रियेचे अमेरिका, जर्मनी आणि स्वीडन येथे प्रशिक्षण त्यांनी घेतले आहे. गुडघ्याच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेतील रोबोच्या साहाय्याने सांधेरोपण हे तंत्रज्ञान अमेरिकेबाहेर भारतात प्रथम आणून त्यांनी 12,000 पेक्षा अधिक शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत.

150 हून अधिक शोध प्रबंध प्रसिद्ध

वैद्य यांनी बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस पदवी संपादन केली. नंतर ऑर्थोपिडिक्समध्ये उच्च शिक्षण घेऊन सुवर्णपदक मिळवले. 150 हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅगझीनमध्ये त्यांचे शोध प्रबंध प्रसिद्ध झाले आहेत. देश विदेशात शंभरहून अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते मानद सदस्य असून अनेक महत्त्वाच्या समित्यांवर त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. ऑर्थोपेडिक हॉस्पिटलची साखळी त्यांनी स्थापन केली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसामान्य जनतेला उपचार मिळावेत यासाठी ते कार्यरत आहेत. नाव नोंदणीसाठी मोबाईल क्रमांक 8355838808 वर संपर्क साधावा.

Advertisement
Tags :

.