जीएसएसच्या बीसीए विद्यार्थ्यांसाठी ओरिएंटेशन कार्यक्रम
प्रश्नमंजुषा, संवाद, सांस्कृतिक, परिचय खेळ, ट्रेझर हंट स्पर्धा उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित जीएसएस महाविद्यालयाच्या बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘इनसाईट-2023’ हा ओरिएंटेशन कार्यक्रम आयोजित केला होता. तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांकडून आयोजित या कार्यक्रमात प्रश्नमंजुषा, संवाद, सांस्कृतिक, परिचय खेळ, ट्रेझर हंट अशा स्पर्धा झाल्या.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून समुपदेशक प्रीती भांदुर्गे, अध्यक्षा बिंबा नाडकर्णी, प्राचार्य बी. एल. मजुकर, समन्वयक प्रा. जीवन बोडस व प्रा. स्नेहलता बंडगी आदी उपस्थित होते.
अनंत केशकामत यांच्या स्वागतगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रा. जीवन बोडस यांनी बीसीए अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक पैलूंची माहिती करून दिली. प्राचार्य मजुकर यांनी विद्यार्थ्यांनी जीवनातील आव्हानांचा सामना करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले.
प्रीती भांदुर्गे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
प्रमुख पाहुण्या प्रीती भांदुर्गे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना चांगली मानसिकता, अपयशावर मात, चौकटीबाहेरचा विचार, कृती आणि विचारांची शहाणपणाने सांगड घालण्याचा सल्ला दिला. समारंभाच्या अध्यक्षा बिंबा नाडकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच गुरुकुल पद्धतीचे महत्त्व विषद केले.