For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केसरीत उद्यापासून दत्तयाग व नवचंडी यज्ञ धार्मिक सोहळा

01:08 PM May 04, 2025 IST | अनुजा कुडतरकर
केसरीत उद्यापासून दत्तयाग व नवचंडी यज्ञ धार्मिक सोहळा
Advertisement

बुधवारी सांगता ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
केसरी गावचे ग्रामदैवत श्री स्वयंभू मंदिरात सोमवार ५ मे पासुन बुधवार ७ मे पर्यंत 'राक्षोघ्र विधान', 'दत्तयाग यज्ञ', 'सग्रह सहोम नवचंडी' या धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. देवसु, दाणोली पाठोपाठ केसरी गावातही पहिल्यांदाच दत्तयाग व नवचंडी यज्ञ हा धार्मिक सोहळा होत आहे. देवसु व दाणोली गावाप्रमाणे या गावातही हा धार्मिक सोहळा यशस्वी करण्यासाठी केसरीवासिय सज्ज झाले असून त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.केसरीचा स्वयंभू, देवसूची शेंडोबा माऊली तर दाणोली गावठणची लिंगमाऊली अशी या तीन गावांच्या देवस्थानची रचना आहे. या धार्मिक सोहळ्यासाठी शनिवारी केसरी स्वयंभू मंदिरात दाणोली लिंग माऊली मंदिरातुन सवाद्य मिरवणुकीने तरंग काठीसह पालखी व देवतांचे आगमन झाले आहे. सोमवार ५ मे रोजी सकाळी ११ वाजता सीमा धड्यांचे विधिवत स्वागत, सायंकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंत देवांना नारळ ठेवणे, गणपती पूजन, स्वस्तिवाचन, राक्षोघ्न विधान धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार ६ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्रायश्चित्त विधी, पुण्यहवाचन, देवता स्थापना, दत्त याग आणि नवचंडी जप, आरती, नैवेद्य आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद, संध्याकाळी ६ वाजल्यापासून दाणोली ग्रामस्थांची भजने, रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. बुधवार ७ मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून प्राकार शुद्धी, स्थापित देवता पूजन, कुंकूमार्जन, कुमारिका पूजन दत्तयाग व नवचंडी यज्ञ, बलिदान (पायस कुष्मांड) पूर्णाहूती, अभिषेक, आशिर्वाद नैवेद्य, आरती दुपारी १ वाजता महाप्रसाद त्यानंतर दुपारी २ वाजल्यापासून देवीची ओटी भरण्यास प्रारंभ होणार आहे. संध्याकाळी ६ वाजल्यापासून दाणोली ग्रामस्थांची भजने, रात्री ८ वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.समस्त भाविक भक्तांनी या धार्मिक सोहळ्यात उपस्थित राहून देवतांचा कृपाशीर्वाद घ्यावा असे आवाहन केसरी गाव मर्यादा व ग्रामस्थांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.