बाळगोपाळ मंडळ आचरातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
आचरा प्रतिनिधी
आचरा वरची चावडी येथील बाळगोपाळ मंडळ आचरा १५ वा वर्धापन दिन दि 27 व 28 जानेवारी रोजी साजरा करणार आहे. या सोहळ्याचे औचित्य साधून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या निमित्त सोमवार दि. २७ रोजी सकाळी ८.०० वा. मंडळाच्या सभागृहामध्ये रक्तदान शिबीर, दुपारी ३.०० वा. मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा, सायं. ५.०० वा. आचरा मर्यादित होम मिनिस्टर स्पर्धा, रात्री ९.०० मंडळाचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ०७.०० वा. श्री रामेश्वर व श्री महापुरुष येथे नारळ ठेवणे, सकाळी ०९.०० वा. सार्वजनिक बोअरवेल जवळ एकादशणी, सकाळी १०.०० वा. मंडळाच्या सभागृहामध्ये श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी १२.०० वा. आरती, दुपारी १२.३० वा. तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी ०३.०० वा. महिलांचे हळदी कुंकू, सायं. ०५.०० वा. सद्गुरू श्री वामनराव पै यांचे शिष्य श्री. दशरथ शिवसाट मुंबई यांचे ज्ञानप्रबोधन व संगीत हरिपाठ, सायं. ०६.०० वा. श्री बाळगोपाळ भजन मंडळ बुवा- श्री. मंदार आचरेकर यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ ०७.०० वा. बुवा श्री. रवींद्र गुरव यांचे सुश्राव्य भजन, रात्रौ १०.०० वा. श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर दशावतार नाट्यप्रयोग, ट्रिकसीनयुक्त महान पौराणिक नाट्यप्रयोग श्री काल हस्तिश्वर हा होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.