महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वेंगुर्लेत १५ जानेवारीला ६ वर्षाखालील मुलांसाठी स्पर्धांचे आयोजन

03:51 PM Jan 12, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग तर्फे बाल आनंद मेळावा

Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग या अराजकीय नोंदणीकृत सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त दि. १५ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ७ या वेळेत नगरवाचनालय, वेंगुर्ला येथे शिशु / बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.सदर मेळाव्यात ६ ते ११ महिने यामधील लहान मुलांची 'रांगण्याची स्पर्धा (अंतर ३० फुट) या विशेष स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय ३ वर्षाखालील मुलांसाठी 'सुदृढ बालक स्पर्धा' होईल तसेच ३ वर्षावरील ते ६ वर्षाखालील मुलांसाठी 'वेशभुषा स्पर्धा' व 'बडबडगीत स्पर्धा' आयोजित केली असून प्रत्येक स्पर्धकाला कमाल २ मिनिटाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.प्रत्येक स्पर्धेत मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे. स्पर्धेतील प्रथम तीन व कमांकांना आकर्षक बक्षिसे देण्यास येणार आहेत. या स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यासह जिलह्यातील स्पर्धकही सहभागी होवू शकतात. या स्पर्धाच्या अधिक माहितीसाठी अँड. नंदन वेंगुर्लेकर-९४२२४३४३५६ यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आधार फाऊंडेशन, सिंधुदुर्ग अध्यक्षा माधुरी वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # sindhudurg news # konkan update # marathi news # vengurla #
Next Article