कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धाकोरे येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन

01:01 PM Jul 25, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली / वार्ताहर

Advertisement

सावंतवाडी तालुक्यातील धाकोरे येथील परिवर्तन महिला शेतकरी संघाच्या वतीने धाकोरा येथे रानभाजी महोत्सव तसेच रानभाजी पाककला स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन सावंतवाडी मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी रानभाजी व औषधी तज्ज्ञ रामचंद्र श्रृंगारे,सावंतवाडी उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे तसेच परिवर्तन संघाच्या अध्यक्षा सौ.मनीषा गोवेकर,सचिव शुभदा गोवेकर,खजिनदार पूजा कोठावळे,उपाध्यक्षा जयवंती गोवेकर,तसेच सदस्य रुपाली मुळीक,संध्या मुळीक,प्रेरणा गवस,स्वप्नाली पालेकर,बबीता गोवेकर,ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पालव,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी उपस्थित स्पर्धकांनी धाकोरा परिसरात मिळणाऱ्या परंतु लुप्त होत जाणाऱ्या अशा पावसाळी हंगामात मिळणाऱ्या भाज्या यात फागले,कुड्याच्या शेंगा,एक पानाची भाजी,अळू,फोडशी,कुरडू,चुरण,पाला यांरख्या नैसर्गिक रित्या उगवणाऱ्या परंतु पोषण मूल्याने परिपूर्ण असलेल्या भाज्यांपासून वेगळेगळे पाककृती सादर केल्या.सदर पाककृतींचे परिक्षण रामचंद्र श्रृंगारे व प्रकाश पाटील यशवंत गव्हाणे यांनी केले.यात अनुक्रमे ममता साटेलकर,अक्षरा नाईक व पूजा कोठावळे यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.तसेच उत्तेजनार्थ संध्या मुळीक व प्रेरणा गवस यांना मिळाला.यशस्वी स्पर्धकाचे मान्यवरांनी अभिनंदन केले.सदर कार्यक्रमाच्यावेळी वनस्पती तज्ञ रामचंद्र श्रृंगारे यांनी महिलांना परिसरात आढळणाऱ्या वेगवेगळ्या वनस्पतींचे आपल्या आहारातील महत्त्व विशद केले.तसेच महिलांनीही धाकोरा पंचक्रोशी परिसरातील औषधी वनस्पतीची माहिती रामचंद्र श्रृंगारे यांच्याकडून घेतली.यावेळी सावंतवाडी मंडळ कृषी अधिकारी प्रकाश पाटील यांनी कृषी विभागाच्या अनेक योजनेंची माहिती देत महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे यांनी धाकोरा परिसरामध्ये सर्वोत्तम दर्जाच्या आंबा काजू नारळ रतांबे आहेत.त्यापासून महिलांनी सांघिक पद्धतीने वेगवेगळी युनिट बनवून प्रोडक्शन तयार करावे त्यासाठी कृषी विभाग सावंतवाडी कडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले.सर्व मान्यवरांनी संघास भविष्यातील उज्ज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी संघाच्या अध्यक्षा सौ.मनीषा गोवेकर यांनी आपला धाकोरा गाव हा नैसर्गिक साधनसामुग्रीचे युक्त आहे.व ते नैसर्गिकपणात टिकून ठेवण्यासाठी संघ नेहमीच कटिबद्ध राहिल निसर्गाच्या माध्यमातून पर्यावरण पूरक आर्थिक उत्पादन करणाऱ्या महिलांच्या मागे संघ नेहमीच उभा राहिल संघाच्या माध्यमातून धाकोरे व पंचक्रोशीतील महिलांसाठी कलम बांधणी प्रशिक्षण देणे किंवा रानभाजी संबधित माहिती देणे वेगवेगळे खाद्य पदार्थ बनवून मॅगो फ्रुड प्रोडक्शनद्वारे त्याची विक्री करणे यासारखे उपक्रम गेल्या तीन वर्षात चालू असल्याचे सांगितले.त्याचा फायदा संघातील महिला घेत आहेत.यापुढेही यासारखे अनेक उपक्रम संघाद्वारे राबवून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी संघ प्रयत्नशील आहे असे सांगितले.यावेळी संघाच्या खजिनदार पूजा कोठावळे यांनी सर्व महिलांनी संघाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.गेल्यावर्षी आयोजित केलेल्या कलम बांधणी स्पर्धेत जास्तीत जास्त कलम बांधून ती वाढवल्याबद्दल रेखा माने यांचा विशेष सत्कार सावंतवाडी उपकृषी अधिकारी यशवंत गव्हाणे यांनी केला.यावेळी संघाच्या उपाध्यक्षा सौ.जयवंती गोवेकर तसेच संघाच्या सचिव सौ.शुभदा गोवेकर यांनी उपस्थित मान्यवरांना शाल व श्रीफळ देऊन आभार व्यक्त केले.तसेच कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल धाकोरा गावचे ज्येष्ठ शेतकरी बाबुराव गोवेकर यांचे विशेष आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी संघाच्या महिलांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली व सदरच्या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article