महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हनुमान कुस्तीगीर संघटनेच्यावतीने भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन

06:01 AM Mar 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उचगाव येथे 31 मार्च रोजी मळेकरणी सप्ताहनिमित्त आयोजन

Advertisement

वार्ताहर/ उचगाव

Advertisement

येथील हनुमान कुस्तीगीर संघटनेच्यावतीने खास धुलीवंदन, होळी आणि मळेकरणीदेवी सप्ताह उत्सवाचे औचित्य साधून रविवार दि. 31 मार्च रोजी होणाऱ्या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या पाच क्रमांकाच्या कुस्त्या निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिल्या क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी आणि अर्जुन वीर काका पवार यांचा पट्ट्या व आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन पैलवान सिकंदर शेख याला हरवलेला पै. महेंद्र गायकवाड पुणे यांच्याविऊद्ध हरियाणा केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर व पैलवान पृथ्वीराज पाटील यांना हरवलेला पै. विशाल भोंडू हरियाणा यांच्यात ही पहिल्या क्रमांकाची कुस्ती होणार आहे.

याबरोबरच दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती सह्याद्री क्रीडा संकुलन काका बराटे यांचा पट्ट्या पै. हितेशकुमार, पुणे यांच्याविऊद्ध शाहू आखाडा पैलवान सादिक पटेल यांचा पट्ट्या पै. उमेश चव्हाण, कोल्हापूर यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पै. प्रकाश पाटील इंगळगी, तालुका धोडगेरी यांच्याविऊद्ध कोल्हापूर शाहू आखाड्याचा पै. किरण जाधव यांच्यात होणार आहे. चौथ्या क्रमांकाची कुस्ती प्रेम जाधव लहान कंग्राळी विऊद्ध पै. संजू इंगळगी यांच्यात होणार आहे. तर पाचव्या क्रमांकाची कुस्ती कीर्तीकुमार बेनके, कार्वे, तालुका कंग्राळी विऊद्ध पै. बाळू शिंदीकुरबेट्ट ता. घोडेगिरी यांच्यात होणार आहे. या कुस्ती मैदानाच्या तयारीसाठी हनुमान कुस्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी जोरदार तयारीला लागले आहेत.

सध्या या कुस्ती मैदानासाठी भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात येत आहे. हनुमान कुस्तीगीर संघटनेच्यावतीने गेल्यावषी कुस्ती आखाडा यशस्वी करण्यात आला होता. हजारो कुस्तीशौकीन या कुस्ती मैदानामध्ये कुस्तीचा आनंद लुटला होता. तसेच यावषीही कुस्ती शौकिनांना चांगल्या कुस्त्यांचे प्रदर्शन करण्याचे आणि चांगल्या कुस्ती मैदान आयोजित करण्याचा चंग कुस्तीगीर संघटनेने बांधला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#wrisling
Next Article