बंदीवानांसाठी सुर्दशनक्रिया, योगा, भजन, नामस्मरण शिबिर
ओरोस येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आयोजन
ओरोस| प्रतिनिधी
बंदीवानांना योग हा व्यायामाचा एक प्रभावशाली प्रकार आहे. ज्याच्या माध्यमातून केवळ शरीराच्या विविध अवयवांमधीलच नाही तर मनाचेही संतुलन राखले जाते. कारागृहाच्या आत चार भिंतीमध्ये बंदी जनांमध्ये स्वस्थ निरोगी, शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी योग अभ्यासाचे महत्व अनन्यसाधारण आहे. तसेच आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये मनः शांती टिकवुन ठेवण्याचा सुरक्षित आणि सोपा मार्ग म्हणजे योग. असे प्रतिपादन कणकवली येथील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या योग प्रशिक्षक रेश्मा परब यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांच्या मार्फत कणकवली येथील आर्ट ऑफ लिव्हींग या संस्थेने जिल्हा कारागृहातील बंदीवानांसाठी आयोजित केलेल्या सुर्दशनक्रिया, योगा, भजन, नामस्मरण या सात दिवसीय शिबिरात रेश्मा सावंत बोलत होत्या. यावेळी जिल्हा व सत्र न्यायाधीश, डॉ. सुधीर देशपांडे, जिल्हा कारागृह अधिक्षक सतिश कांबळे, कणकवली येथील आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक, अँड श्रीम उल्का पावसकर, प्रमोद जाधव उपस्थित होते.यावेळी रेश्मा परब यांनी योग प्रात्यक्षिकांच्या माध्यमातुन मानसिक आणि शारीरीक संतुलन कसे राखले जाते याबाबत महत्व सांगितले. सात दिवस चाललेल्या या शिबीरात एकुण ५२ बंदीवानांनी सहभाग घेतला. बंदीवानांसाठी शिबिर आयोजित केल्याबद्दल कणकवली येथील आर्ट ऑफ लिव्हींगचे जिल्हा कारागृह अधिक्षक सतिश कांबळे यांनी आभार मानले.