म्हैसाळ पाण्यासाठी संघटित आंदोलनाला यश : राजू मुचंडी
सोन्याळ :
म्हैसाळ योजनेचे पाणी मिळवण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने संघर्ष करणाऱ्या सोन्याळ व परिसरातील शेतकऱ्यांच्या संघटित आंदोलनाला अखेर यश आले आहे. सध्या माडग्याळ ओढ्यातून कॉनेगोळ तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती युवा कार्यकर्ते राजू मुचंडी यांनी दिली.
राजू मुचंडी म्हणाले, सोन्याळ येथील शेतकऱ्यांनी शांततेत आणि संघटित पद्धतीने विविध स्तरांवर मागणी करत पाणी मिळवण्यासाठी मोठा आवाज उठवला. रास्ता रोकोचा इशारा दिला. सर्व पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन पाणी सोडण्यासाठी मागणी केली. या प्रयत्नांमुळे अखेर प्रशासनाने सकारात्मक पावले उचलली असून म्हैसाळ योजनेचे पाणी माडग्याळ ओढ्यात सोडण्यात आले आहे. या पाण्यामुळे सोन्याळ परिसरातील बगलीवस्ती, नदाफवरती, परीटवस्ती निवर्गीवस्ती, जमखंडीवस्ती, मुचंडीवस्ती, हळळी वस्ती, परिसरातील शेतकऱ्यांची चांगली सोय होणार आहे. फळपिके वाचण्यास मदत होणार असून, आर्थिक नुकसान टळण्याची शक्यता आहे. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रशासनाने यापुढेही पाण्याचा शाश्वत आणि वेळेवर पुरवठा करावा, ही आमची मागणी आहे.
यावेळी महादेव उमराणी, श्रीशैल संगप्पा निवर्गी, भीमराय मलाबादी, विठ्ठल निलप्पा बिरादार, अनिल हळळी, सुरेश नंदूर, सिदण्णा रामण्णा निवर्गी, संगप्पा निवर्गी, महादेव चौगुले, महादेव मुचंडी, सिद्राय मुचंडी, सिद्राय चौगुले, आण्णाप्पा मुचंडी, महादेव जमखंडी, घरेप्पा जमखंडी, मक्कुसाब नदाफ, रमेश बगली, कुतबुद्दीन नदाफ, सादू परीट, मुदकाप्पा निवर्गी, कामणा बिरादार, चिदानंद बिरादार आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते