महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लक्षावधी कार्यक्रम आयोजित

06:16 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

50,000 ठिकाणी सुंदरकांड, 30 हजार ठिकाणी महाप्रसादाचे वाटप

Advertisement

अयोध्येच्या राम मंदिरात पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. केवळ व्यापारी संघटनांनीच विविध राज्यांमध्ये सुमारे 50 हजार ठिकाणी सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण करविले आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी या सोहळ्यानिमित्त देशातील विविध शहरांच्या बाजारपेठांमध्ये 30 हजारांहून अधिक ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आल्याची माहिती दिली. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत रामासंबंधी सुमारे 40 हजार कार्यक्रम आयोजित करण्यात आले हेते. अशाप्रकारे देशभरात आयोजित सर्व कार्यक्रमांचा एकूण आकडा 1 लाखाहून अधिक ठरला आहे.

Advertisement

श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेकरता देशभरात अनेक संघटना, लोकांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आले. दिल्ली समवेत देशभरात धार्मिक कार्यक्रमांचा जणू महापूरच आला होता. देशातील सर्व बाजारपेठा पूर्णपणे भगव्या ध्वजांनी सजलेल्या दिसून आल्या. बाजारपेठांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘हर शहर अयोया-हर घर अयोध्या’ ही थीम राबविण्यात आली.

कॅटच्या आवाहनावर व्यापारी संघटनांनी कार्यक्रमांचे आयोजन केले.

अनेक ठिकाणी सुंदरकांड तर अन्य ठिकाणी हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीतच दोन हजारांहून अधिक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात लाखो ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे दर्शन कोट्यावधी लोकांना घडविण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी संगीतमय राम गीत तसेच राम भजन  कार्यक्रम आयोजित करण्यात आले. देशातील सर्व शहरांमध्ये-गावांमध्ये श्रीराम शोभायात्रा तसेच श्रीराम फेरी काढण्यात आली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article