सावंतवाडीतील नरकासुर स्पर्धेत "चितारआळी बॉईज" संघाचा डंका
ओंकार कलामंच व राष्ट्रवादीचे आयोजन; बाल गटातून उभाबाजार मित्र मंडळ प्रथम
ओंकार कला मंच सावंतवाडी आणि राष्ट्रवादी तालुका व युवक काँग्रेस यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या खुल्या नरकासुर स्पर्धेचा मानकरी चितारआळी बॉईज संघ ठरला तर बाल गटातील प्रथम क्रमांक उभा बाजार बालगोपाल मित्र मंडळाच्या नरकासुराने पटकावला. येथील मोती तलावाच्या काठावर अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नरकासुर पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेचे कोकण सचिव आनंद साधले, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक ज्ञानेश्वर ऐवाळे, सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पै, अँड.अनिल निरवडेकर, माजी नगरसेवक सुधन्वा आरेकर,ओंकार कला मंचचे अध्यक्ष अमोल टेंबकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवा टेमकर, युवक शहराध्यक्ष नईम मेमन, हिदायतुल्ला खान, सदस्य हेमंत पांगम, आनंद काष्टे, सचिन मोरजकर, नितेश देसाई, भुवन नाईक, हंजला नाईक, कृपेश राठोड, आर्या टेंबकर, ओम टेंबकर, विश्वकला डान्स अकॅडमीचे संचालक तुळशीदास आर्लेकर, एम.जे. डान्स अकॅडमीचे संचालक महेश जांभोरे, मिहीर मठकर, अरुण भिसे, आवेज खान, आफताप मेमन, रजि बेग, तुषार चव्हाण,पुजा दळवी,अमोल दळवी,सिध्देश पुरलकर आदी उपस्थित होते.
यावेळी काढण्यात आलेला निकाल पुढीलप्रमाणे अनुक्रमे:- खुलागट प्रथम क्रमांक चितारआळी बॉईज, द्वितीय क्रमांक श्री देव आत्मेश्वर मंदिर माठेवाडा मित्र मंडळ, तृतीय क्रमांक हनुमान बालगोपाळ मित्र मंडळ माठेवाडा, तर बाल गटातून प्रथम क्रमांक बालगोपाल मित्र मंडळ उभाबाजार द्वितीय क्रमांक झपाटा मित्र मंडळ सबनीससवाडा तर तीन उत्तेजनार्थ क्रमांक तिन मंडळांना देण्यात आले. यात उभा बाजार झिंगाट बॉईज (शिवाजी चौक) बिरोडकर टेंब सावंतवाडी आणि महापुरुष कला क्रीडा मंडळ गोठण या तिघांना गौरविण्यात आले. येथील श्रीराम वाचन मंदिर समोरील मोतीतलावाच्या काठावर ही स्पर्धा घेण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी प्रेक्षकांना व स्पर्धकांना मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे परीक्षण सिद्धेश नेरुरकर, तुकाराम मांजरेकर, सुषमा पालव यांनी केले तर सूत्रसंचालन सचिन सावंत यांनी केले.