अग्निवीर जवानांसाठी उद्या प्रशिक्षण शिबिर
खानापूर येथील लोकमान्य सभागृहात आयोजन
प्रतिनिधी/ खानापूर
लोकमान्य एज्युकेशन सोसायटी संचालित रावसाहेब वागळे महाविद्यालय आणि व्ही. वाय. चव्हाण तांत्रिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 9 रोजी येथील लोकमान्य सभागृहात अग्निवीर सेवेत दाखल होणाऱ्या युवकांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन सकाळी 11 वाजता लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष पंढरी परब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी निवृत्त कर्नल दीपक गुरुंग मार्गदर्शन करणार आहेत. तसेच लोकमान्य एज्युकेशन संस्थेच्यावतीने सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
उन्हाळ्यात सुट्टी सुरू झाल्यावर या कोर्सेसची सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती डी. एन. मिसाळे यांनी दिली. अग्निवीर मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य शिरीष केरूर आणि प्राचार्या सरयू कदम यांनी केले आहे.