महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रमुख विरोधी नेत्या खालिदा झिया यांच्या सुटकेचे आदेश

06:32 AM Aug 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथवून टाकल्यानंतर आता बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी माजी पंतप्रधान आणि प्रमुख विरोधी पक्षनेत्या खालिदा झिया यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी रात्री राष्ट्रपतींनी झिया यांची तात्काळ तुऊंगातून सुटका करण्याचे आदेश जारी केले. याशिवाय लष्कराकडून आणखी एक मोठे अपडेट समोर आले आहे. बांगलादेशातील संचारबंदी मंगळवारी सकाळी संपेल, असे लष्कराने म्हटले आहे. त्यानंतर शाळा आणि व्यवसाय पुन्हा सुरू होतील, असे जाहीर करण्यात आले आहे.

Advertisement

शेख हसीनांचा राजकारणाला रामराम : पुत्राचा दावा

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा मुलगा साजिब वाजेद जॉय यांनी सोमवारी आपली आई आता राजकारणात परतणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे. आपल्या आईने कुटुंबाच्या विनंतीवरून स्वत:च्या सुरक्षेसाठी देश सोडला, असेही त्यांनी सांगितले. जॉय यांनी ‘बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस’वर ‘न्यूजअवर’ला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article