For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुस्ताफिजुरला मुक्त करण्याचा आदेश

06:47 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुस्ताफिजुरला मुक्त करण्याचा आदेश
Advertisement

वृत्तसंस्था / गुवाहाटी

Advertisement

2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी कोलकत्ता नाईट रायडर्सने (केकेआर) खरेदी केलेला बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रेहमानला मुक्त करण्याचा आदेश भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (बीसीसीआय) दिला आहे.

सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध अधिक तणावग्रस्त होत चालले आहेत. दरम्यान केकेआर संघाने आगामी आयपीएल स्पर्धेसाठी मुस्ताफिजुर रेहमानला 9.20 कोटी रुपयांच्या बोलीवर खरेदी केले होते. दरम्यान मुस्ताफिजुर रेहमानला तातडीने मुक्त करण्याचा आदेश बीसीसीआयने केकेआरला दिला आहे. त्याच्या जागी दुसऱ्या बदली खेळाडूला जरुरी भासल्यास घेण्याची परवानगी या संघाला बीसीसीआयने दिली आहे. अलिकडेच बांगलादेशमध्ये हिंदुंची कत्तल होत असून उभय देशांतील राजकीय संबंध आता तणावग्रस्त होत चालले आहेत. त्यामुळे आगामी आयपीएल स्पर्धेवेळी खबरदारी म्हणून मुस्ताफिजुरला या स्पर्धेत न खेळविण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.