महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

डेंग्यूबाबत उपाययोजना राबविण्यासाठी आदेश

06:48 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खबरदारीचा इशारा, औषध फवारणीवर भर

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

जिल्ह्यामध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर हॉटस्पॉट ठिकाणाची नोंद घेऊन डेंग्यू निदान केले जात आहे. तर ग्रामीण भागामध्ये ग्राम पंचायतींना औषध फवारणी व उपाययोजना राबविण्यासाठी आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीकडून औषध फवारणीला वेग देण्यात आला आहे.

जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर डेंग्यू रुग्णांची संख्या वाढल्याचे निदर्शनास आले. तर संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये डेंग्यू आजारासंदर्भात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन डेंग्यू निवारणासाठी तातडीने उपाययोजना राबविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून डेंग्यू निवारणासाठी आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गसूची जारी करण्यात आली आहे. जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांना औषध फवारणीचा व उपाययोजना राबविल्याचा अहवाल देण्याची सूचना केली आहे. त्यामुळे ग्राम पंचायतीकडून औषध फवारणी करण्यात येत आहे. गटारीच्या बाजूने वाढलेल्या गवतावर तणनाशक औषध फवारणी करून परिसर स्वच्छ ठेवण्यावर भर देण्यात येत आहे. ग्राम पंचायत विकास अधिकाऱ्यांना तालुका पंचायतीकडून कडक सूचना करण्यात आल्याने औषध फवारणीवर भर देण्यात आला आहे.

तसेच गावपातळीवर नागरिकांना अधिक दिवस पाणी साठवून ठेवू नये, परिसर स्वच्छ ठेवावा, याबाबत आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांसह आशा कार्यकर्त्यांकडून घरोघरी जाऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. अधिक दिवस पाणी साठवू नये, अशी सूचना करून साठवलेल्या पाण्याची तपासणी केली जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article