मशिदीचे बांधकाम पाडण्याचा आदेश
07:00 AM Oct 06, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथील वादग्रस्त संजौली मशिदीचे बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश शिमला महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिला आहे. त्यानुसार आता या मशिदीचे तीन बेकायदा मजले पाडण्यात येणार आहेत. या मशिदीच्या विरोधात काही दिवसांपूर्वी स्थानिक जनतेने आणि हिंदू संघटनांनी मोठे आंदोलन केले होते. ही मशीद सरकारी जागेवर अतिक्रमण करुन बांधण्यात आली आहे, असा आंदोलकांचा आक्षेप होता. तसेच या मशिदीच्या आसपास घुसखोरांनी वस्ती केली असून त्यामुळे या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचाही स्थानिकांचा आरोप आहे. या आंदोलनाची नोंद आता हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारला घ्यावी लागली असून बांधकाम पाडविले जाणार आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article