For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीज दरांमध्ये सुधारणा करणारा आदेश जारी

07:00 AM Mar 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
वीज दरांमध्ये सुधारणा करणारा आदेश जारी
Advertisement

बेंगळूर : ऐन उन्हाळ्यात राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा ‘शॉक’ बसला आहे.  कर्नाटक वीज नियंत्रण आयोगाने पुढील तीन वर्षांसाठी लागू होणाऱ्या वीज दरांमध्ये सुधारणा करणारा आदेश जारी केला आहे. सुधारित वीज दर 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. तीन वर्षांसाठी म्हणजे 2025-26, 2026-27 आणि 2027-28 या आर्थिक वर्षासाठी लागूप्रमाणे वीज दरात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार एल.टी. घरगुती वापरकर्त्यांसाठी वीज शुल्क 2025-26 मध्ये 10 पैशांनी आणि 2027-28 मध्ये 5 पैशांनी कमी करण्यात आले आहे. 2026-27 मध्ये कोणत्याही दराची सुधारणा नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.