For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आज दुपारपासून मंगळवारी रात्रीपर्यंत दारुविक्री बंदीचा आदेश जारी

12:45 PM Mar 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आज दुपारपासून मंगळवारी रात्रीपर्यंत दारुविक्री बंदीचा आदेश जारी
Advertisement

बेळगाव : होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर व तालुक्यात सोमवार दि. 2 मार्चच्या दुपारी 2 पासून मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत दारुविक्री बंदीचा आदेश देण्यात आला आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. सोमवारी दुपारी 2 पासून वाईन शॉप, दारू दुकाने, बार, क्लब व हॉटेलमध्ये दारुविक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची सूचनाही अतिरिक्त दंडाधिकारी असणाऱ्या पोलीस आयुक्तांनी दिला आहे. मंगळवार दि. 3 मार्चच्या रात्री 11.59 पर्यंत हा आदेश जारी असणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.